तुम्ही बसमधील असं मिनी गार्डन पाहिलंय का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

प्रदूषण रोखण्यासाठी ड्रायव्हरने एक अनोखा उपक्रम केला आहे. "झाडे लावा, झाडे जगवा " चा संदेश देत बसमध्येच मिनी गार्डन तयार केले आहे. या संपूर्ण बसमध्ये प्रत्येक सीटच्यामागे एक कुंडी लावली आहे. कुंडीमध्ये वेगवेगळं झाड लावलं आहे. हे सर्व केलाय ते या बसचे ड्रायव्हर श्री. नारायण अप्पा यांनी..!

वाढत प्रदूषण रोखण्यासाठी काहीतरी करायला हवं म्हणुन नारायण अप्पा यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. बसमध्येच मिनी गार्डन तयार केलं. सीटच्या मागे कुंडीमध्ये छोटी छोटी शोभेची झाड लावली. तर पुढे केबिनमध्ये ही वेगवेगळी झाडे लावली आहेत. बसमध्ये झाड लावल्याने बसला गार्डनच स्वरूप आलं आहे. बघता बघता ही बस पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली.

बेंगुलूरूच्या बी. एम. टी. सी. चे बस ड्राइवर नारायण अप्पा हे गेले चार वर्ष हा अनुभव उपक्रम राबवतात. बसमधल्या प्रवाशांना देखील झाडांचं काय महत्व आहे त्याबद्दल माहिती देतात. या उपक्रमामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण होते. चक्क बसमध्येच गार्डन केल्यामुळे नारायण अप्पा यांचे सर्वत्र कौतुक होते. अनेक प्रवासी बसमध्ये गार्डन पाहण्यासाठी येत असतात.

त्यामुळे  बी. एम. टी. सी.चाही फायदा होतोय आणि पर्यावरण वाचवण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहचतो. त्यामुळे तुम्हीही अशी झाडे लावा आणि पर्यावरण वाचवा. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News