युझवेंद्र चहलच्या होणाऱ्या बायकोचा जबरा डान्स तुम्ही पाहिला का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 September 2020

युझवेंद्र चहलच्या होणाऱ्या बायकोचा जबरा डान्स तुम्ही पाहिला का ? 

सोशल मीडिया लोकांपर्यंत पोहचण्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. कारण एखादी गोष्ट किंवा घटना घडली तर तात्काळ तुम्ही व्हायरल होत असता. त्याच्यात जर तुम्ही प्रसिध्द व्यक्ती किंवा सेलिब्रिटी असाल तर तुम्ही देशभरात व्हायरल होता. कारण आज प्रत्येकाकडे मोबाईल असल्यामुळे प्रत्येकजण आपल्या फावल्यावेळेत सोशल मीडियावर सक्रीय असतो.

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल हा सुध्दा सोशल मीडियावर अधिक चर्चेत असतो. कारण त्याचे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरती मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. युजवेंद्र चहलची होणारी बायको सुध्दा सोशल मीडियावर अनेक कारणांनी चर्चेत असते. तिचं नाव धनश्री वर्मा असून ती तिच्या डान्समुळं नेहमी चर्चेत असते. तिचे फेसबुक युट्यूब आणि इंन्स्टाग्रामला अधिक चाहते आहेत. धनश्रीचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवरती व्हायरल झाले आहेत. आता ती मुकाबला सॉन्ग या गाण्यावर नाचल्याचा व्हिडीओ सोशल माीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. धनश्रीने हा व्हिडीओ तिच्या इंन्स्टाग्रामवरती शेअर केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना अधिक आवडला.

हा डान्स तिने तीच्या ग्रुपसोबत केला असून धनश्रीने या डान्स करताना व्हाईट आणि ब्लॅक कलरचा आऊटफिट घातला आहे. त्याबरोबर त्याच्यावरती सिल्वर कलरची जॅकेट घातली आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर हे कोणतं गाणं आहे असं धनश्रीने विचारलं होतं. तिच्या अधिक चाहत्यानी त्यावर धनश्रीला रिप्लाय दिला आहे.

धनश्री व्यवसायाने एक डॉक्टर त्याचबरोबर ती एक उत्तम नर्तक देखील आहे. तिचे अनेक व्हिडीओ युट्यूबसह अनेक सोशल मीडियावरती आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओवरती धनश्रीच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. तसेच अभिप्राय सुध्दा दिला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News