सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारी लग्नपत्रिका वाचलात का?

सुयोग घाटगे
Monday, 27 May 2019

येयेये... भावा हे कोल्हापूर हाय... इथलं इषय लै हार्डच असत्यात... बघ आम्ही लगीनच नाय तर लग्नाची पत्रिका पण घुमिवताव... बघ जरा हि नाद खुळा पत्रिका...

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील सोशल मिडीयावर एक लग्नपत्रिका धुमाकुळ घालतेय. कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत लग्नाचे निमंत्रण “सांगावा लग्नाचा” या शिर्षकाखाली छापले असून वाचताना मजेशीर पण तितकेच अगत्यपूर्ण आणि प्रेमळ असल्याचे दिसून येतय…

कोल्हापूरातील युवा आर्टिस्ट अमर रानगे यांनी आपल्या लहान भावाच्या लग्नाची ही पत्रिका अनोख्या अंदाजात तयार केलीय. यामध्ये लिहिलेल्या ओळी कोल्हापूरच्या रांगडेपणाची साक्ष देतात… पाहूया काय आहेत या ओळी…

सांगावा लग्नाचा…
रामराम…
तर सांगायच म्हंजे

आमचा विज्या लग्नाला आला.
तुमचं त्वांड रोज गुळमाट करायच्या घाईत आणि
रसवंतीच्या खुळूखुळू वाजणाऱ्या घुंगराच्या नादात
हे कळलंच नाही राव...

ऊसाच्या कांड्या रसवंतीच्या मशिनमध्ये 
घालणाऱ्या तेच्या हाताला हळद लावायचं
आम्ही ठरवलंय...

चि. विजय
आणि 
चि.सौ.कां. सुवर्णा
यांच लगीन बुधवारी २९ तारकीला
दुपारी 1 वा. 32 मि. या शुभमुहूर्तावर हुणार...

देवानं लगीन गाठ बांधल्याच
तांदूळ टाकायचं काम तुमचं आमचं
जेवणाचाबी फक्कड बेत...

वसंत हरी मंगल कार्यालय,
फुलेवाडी जकात नाक्याजवळ,
बालिंगा, कोल्हापूर इथं
रस न्हवं... रस्सा… वडायचा तेबी तांबडा-पांढरा
नक्की या...

यायलाच लागतंय..!
कळावे
लक्ष्मण आप्पाजी रानगे
अमर लक्ष्मण रानगे
साकोली कॉर्नर, कोल्हापूर 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News