डोक्यात सेक्सचे विचार असले की माणसं खोटं बोलतात?

यिनबझ टीम
Friday, 22 November 2019

तुमच्या डोक्यात सेक्सचे विचार येत असले की तुम्ही खोटं बोलण्याची शक्यता जास्त असते? हा जरी प्रश्न साधा वाटत असला तरी त्यावर संशोधन झाल्याचे बीबीसी मराठीने वृत्त दिले आहे. या संशोधनात अशी गोष्ट समोर आली आहे की सतत सेक्सबद्दल विचार करत असणारे लोक जास्त फसवे असतात किंवा ते सेक्ससाठी खोटं बोलत असतात. 

संशोदनाच्या दरम्यान काही तरुण आणि तरुणींना पॉर्न व्हिडीओ दाखवण्यात आले होते आणि काही वेळानंतर मनोरजंन कऱणारे साधे व्हिडीओ दाखवण्यात आले. त्यावेळी काही लोकांमध्ये दोन्ही परिस्थितीच्या वेळी वेगवेगळे फरक जाणवत होते. 

ते झाल्यानंतर संबंधीत तरुण आणि तरुणींना त्यांना ज्या विषयाबद्दल आवड आहे, त्या विषयावर काहीतरी लिहण्यासाठी सांगितले. ज्यावेळी तो लिहलेला विषय आपल्या जोडीदारासोबत शेअर करण्यासाठी सांगितले तेव्हा मात्र त्यांच्या लिखानामध्ये आणि जोडीदाराला सांगितलेल्या गोष्टीमध्ये तफावत अढळून आली.

सतत सेक्सचा विचार मनामध्ये येणाऱ्या लोकांमध्ये 30 टक्के खोट्या गोष्टी आढळून आल्या. ज्यावेळी त्यांच्या जोडीदाराला "तुम्ही आजपर्यंत किती लोकांसोबत शरीरसंबंध ठेवलाय?" या गोष्टीची उकल करण्याची वेळ आली त्यावेळी ते खोटे बोलत होते. ही गोष्ट सांगताना ते घाबरत होते. काहीप्रमाणात खोटेही बोलत होते. 

या सगळ्यावर संशोधक या विचारावर येऊन पोहोचले की, अनोख्या व्यक्तीशी संबंध जुळावेत यासाठी लोक काहीही करू शकतात. ते स्वत:च्या खोटे बोलण्याच्या सर्व सिमा तोडू शकतात. 

या सगळ्यातून जर तुम्हाला बाहेर यावसं वाटत असेल तर त्यासाठी काही सोप्पे आणि तुम्हाला पटण्यासारखे उपायदेखील आहेत. तुम्ही एखाद्या आवडत्या विषयावर वाचन सुरू करा, तुमच्या मित्र मैत्रिंणींमध्ये मिसळा. काही दिवसांसाठी भविष्यातील गोष्टींचा विचार करणे सोडून द्या. सतत तुमची जागा बदलत जा. अनोळख्या ठिकाणी फिरायला जा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News