कार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत?... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा 

सलील उरुणकर
Monday, 12 October 2020

एमजी डेव्हलपर अँड ग्रांट हा उपक्रम अडोबी, काॅग्निझंट, सॅप, टाय-दिल्ली एनसीआर, अनलिमिट आणि मॅपमायइंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थी, स्टार्टअप्स, इनोव्हेटर्स, संशोधक आणि टेक्नाॅलाॅजी कंपन्याही सहभागी होऊ शकतात.

कार संबंधीत इनोव्हेटीव्ह आयडिया आहेत?... मग इथे अप्लाय करा आणि ग्रांट मिळवा

कनेक्टेड मोबिलिटी, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर. इलेक्ट्रिक व्हेईकल्स अँड काँपोनंट्स, कार बायिंग एक्सपिरियन्स, बॅटरी मॅनेजमेंट, व्हाॅईस रेकगनिशन, नॅव्हिगेशन टेक्नाॅलाॅजी या व अन्य कोणत्याही विषयांशी संबंधित तुमच्याकडे काही नावीन्यपूर्ण संकल्पना असतील तर आता तुमच्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध झाली आहे.

एमजी मोटर इंडिया कंपनीतर्फे एमजी डेव्हलपर प्रोग्रॅम आणि ग्रांट २.० हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भारतातील अर्बन मोबिलिटी क्षेत्रातील इनोव्हेशनला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो. ग्राहकांच्या दृष्टीने कार खरेदी करताना येणारा अनुभव अधिक समृद्ध व संपन्न करण्याच्या दृष्टीने नव्या युगातील नवे पर्याय शोधून काढण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो. साहजिकच आॅटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये अनेक बदल त्यामुळे घडून येत आहेत.

एमजी डेव्हलपर अँड ग्रांट हा उपक्रम अडोबी, काॅग्निझंट, सॅप, टाय-दिल्ली एनसीआर, अनलिमिट आणि मॅपमायइंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थी, स्टार्टअप्स, इनोव्हेटर्स, संशोधक आणि टेक्नाॅलाॅजी कंपन्याही सहभागी होऊ शकतात. त्यासाठी https://www.mgmotor.co.in/world-of-mg/events/mg-developer-program-grant या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता.

एमजी डेव्हलपर अँड ग्रांट हा उपक्रम २०१९ मध्ये सुरू झाला. पहिल्याच वर्षी उपक्रमात ३२० जणांनी सहभाग घेतला. त्यापैकी ६० संघांना निवडण्यात आले व २५ मेन्टाॅर्सच्या साहाय्याने मार्गदर्शन देण्यात आले. एकूण ९ स्टार्टअप्सला ग्रांटसाठी निवडण्यात आले. त्यामध्ये ड्रिफ्टली इलेक्ट्रिक, इन्वोल्यूशन्स हेल्थकेअर, वोक्सोमोस, हायवे डिलाईट, इन्कॅबेक्स, कॅमकाॅम, क्लिअरकोट, मीसीक्स आणि सोशलकोअर या स्टार्टअप्सचा समावेश होता.

एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शियल आॅफिसर गौरव गुप्ता म्हणाले, "आजच्या आधुनिक जगातील कार वापरणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडवू शकतील अशा चाणाक्ष तरुणाईच्या शोधात आम्ही आहोत. विशेषतः आॅटो-टेक स्टार्टअप क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण मुला-मुलींनी या संधीचा लाभ नक्कीच घ्यावा."

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News