मोदींच्या प्रचारात द्वेष अन्‌ खोटेपणा, कोण म्हणतंय ? पाहाच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • वायनाडमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची टीका
  • कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

वायनाड: काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज वायनाड दौऱ्याच्या सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. मोदींची लोकसभा निवडणुकीची प्रचार मोहीम ही खोटेपणा, विष आणि द्वेषाने भरलेली होती असे सांगत आमच्या पक्षाने मात्र सत्य, प्रेम आणि जिव्हाळा यांच्या बाजूने उभे राहणे पसंत केल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर राहुल हे प्रथमच केरळच्या दौऱ्यावर आले असून, कलपेट्टा येथे त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कम्बालाकडू आणि पानामारम भागामध्ये त्यांनी रोड शोही केले. या वेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘युनाटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’च्या हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. राहुल यांच्यासमवेत या वेळी काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी के. सी. वेणुगोपाल, केरळमधील विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथाला आणि केरळ काँग्रेसचे प्रमुख मुल्लापल्ली रामचंद्रन आदी नेते उपस्थित होते.

दरम्यान, याच भागामध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस कोसळल्याने सर्वत्र चिखल झाला होता; पण आजच्या राहुल यांच्या रोड शोवर याचा काहीही परिणाम झाला नाही.

आपण एकत्रितपणे काम केल्यास वायनाडमधील समस्या सोडवल्या जाऊ शक तात. लोकसभेमध्ये वायनाडला सादर करणे ही माझी जबाबदारी आहे. येथे अनेक समस्या असून त्याचे निराकरण करावे लागेल.
- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News