हरिश्र्चंद्रगड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 August 2020
  • ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्र्चंद्रगड होय. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्र्चंद्रगड.

ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्र्चंद्रगड होय. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्र्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पाश्र्वर्भूमी आहे, तर हरिश्र्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पाश्र्वर्भूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्र्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात आणि मत्स्यपुराणात आढळतो. १७४७-४८ मध्ये हा किल्ला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुत्त्की केली.

गडावर चहापाण्याची आणि जेवणाची सोय होते. पावसाळ्यात या गडाचे सौंदर्य काही औरच असते. वनस्पतींची विविधता या गडाएवढी इतरत्र कुठे ही आढणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणीवैभव मात्र शिकारींमुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुक्करे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाइची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तहेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्र्चंद्रगड ‘ट्रेकर्सची पंढरी’ ठरतो.

कोकणकडा म्हणजे हरिश्र्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण आहे. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, अर्धगोल आकाराचा, काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाव्दितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूट भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारण ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. १८३५ मध्ये कर्नल साइक्सला येथे “इंद्रव्रज” दिसल्याची नोंद आहे. इंद्रवज म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य होय. येथील निसर्गसौंदर्यावर लुब्ध होऊन एका तरूणाने या कड्यावरून उडी घेतली त्याच्या नावाची संगमरवरी पाटी येथे आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News