२३ दिवसांपासून हार्दिक पटेल बेपत्ता असल्याची पत्नीची तक्रार  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 February 2020

गांधीनगर - पाटीदार समाजासाठी तळवळीने काम करणारे, त्यांच्या आरक्षणासाठी नेतृत्व करणारे हार्दिक पटेल मागील २३ दिवसांपासून बेपत्ता असल्याचा दावा त्यांच्या पत्नीकडून करण्यात आला आहे. १८ जानेवारीच्या दिवशी हार्दिक यांना पोलिसांनी देशद्रोहाच्या आरोप ठेवून अटक करण्यात आली होती असं त्यांच्या पत्नी किंजल यांचं म्हणणं आहे. 

एका प्रकरणातील सुनावणीला हार्दिक पटेल  गैरहजर राहिल्याने अजामिनपात्र अटक वॉरंट जारी करण्यातं आले होते. 

अटक झाल्यानंतर साधारण चार दिवसांनी हार्दिकला जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु गुजरातमधील पाटण आणि गांधीनगर जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तात्काळ अटक करण्यात आली. 

२४ जानेवारीला जामीन मिळाला, मात्र सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्याने पुन्हा त्यांना अटक करण्यात आली आहे.  विशेष म्हणजे पाटीदार आरक्षण आंदोलनासंदर्भात खटला सुरू आहे. 

मुळात पटेल यांच्या विरोधात राज्यभरात २० पेक्षा अधिक खटले दाखल आहेत. यापैकी दोन देशद्रोही खटल्याशी निगडीत असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. पाटीदार आरक्षणाच्या संदर्भात नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पटेल यांच्या पत्नींनी अटक झाल्यापासून पटेल बेपत्ता असल्याचे सांगत आहेत. याबाबत त्यांनी पोलिसांनी वारंवार विचारणा करून उत्तर मिळत नसल्याचे बैठकीत सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News