हरभजन सिंगची चाहत्यांसाठी फिरकी गुगली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 13 September 2020

हरभजन सिंगची चाहत्यांसाठी फिरकी गुगली

हरभजन सिंगची चाहत्यांसाठी फिरकी गुगली

नवी दिल्ली - २००८ साली सुरू झालेल्या आयपीएलने अनेक खेळाडूंचं आयुष्य बदललं तसंच अनेक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. भारतातही असे अनेक खेळाडू आहेत. ज्यांना आयपीएलमुळे राष्ट्रील पातळीवर खेळण्याची संधी मिळाली. आत्तापर्यंत आयपीएलचे १२ सीजन भारतात झाले. यंदाचा सीजन कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे दुबई खेळवला जाणार आहे. संघ सामने होणा-या देशात पोहोचले असून त्यांनी तिथे जाऊन सरावाला सुरूवात देखील केली आहे.

१९ सप्टेंबरपासून सुरू होणा-या आयपीएलसाठी सगळे संघ तिथे पोहोचले आहेत. परंतु चेन्नई सुपर किंग्ज संघातील फलंदाज सुरेश रैना आणि फिरकीपटू हरभजन सिंग या दोघांनी वैयक्तिक कारण पुढे करत आयपीएल मधून माघार घेतली आहे. दोघांनीही ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. तसेच हरभजन सिंग मोठा खुलासा करणार असल्याचे सुध्दा ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघातील हरभजन सिंगने काही दिवसांपूर्वीच आयपीएल खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. हे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितल्यानंतर चाहते चकित झाले होते. काही दिवस झाल्यानंतर आता पुन्हा चाहत्यांसाठी एक गुगली टाकली असून येत्या काही दिवसात मोठा खुलासा करणार असल्याचे ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

क्रिकेटबाबत एक गोष्ट समजली असून क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोन कायम बदलेलं असेही म्हटले आहे. सध्याच्या घडीला क्रिकेट अधिक चर्चेत आहे. त्यामुळे आता असे काही घडले आहे की क्रिकेटचे चित्र कायमचे बदलेल असेही ट्विटमधून हरभजनने म्हटले आहे. तसेच घडलेल्या गोष्टीमुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडणार आहे. हरभजन सिंगच्या ट्विटवरून  क्रिकेट विश्वात कायतरी भयानक घडणार असल्याचं दिसतंय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News