Happy Valentine's day ...म्हणून 14 फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन्स डे म्हणतात

यिनबझ टीम
Friday, 14 February 2020

आता हा व्हॅलेन्टाईन्स डे 14 फेब्रुवारी रोजीच का साजरा केला जातो? यामागेही एक कारण आहे, आपण ते कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

आज सगळीकडे व्हॅलेन्टाईन्स डे साजरा केला जातो. आपल्या मनात असलेल्या प्रेमाची भावना मांडण्याचा दिवस म्हणून देखील या दिवसाला ओळखलं जातं. आता तसा प्रेम करणाऱ्यांसाठी कुठला दिवस गरजेचा असतो का? तर नाही, तरीही एक पाश्चिमात्य देशांकडून चालत आलेली संस्कृती म्हणून आपल्या देशातली तरुण मंडळीही काही ठिकाणी हा दिवस आपल्या व्हॅलेन्टाईन्ससोबत साजरा करतात. आता हा व्हॅलेन्टाईन्स डे 14 फेब्रुवारी रोजीच का साजरा केला जातो? यामागेही एक कारण आहे, आपण ते कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

14 फेब्रुवारी रोजी आपण आपल्या व्हॅलेन्टाईन्सला चॉकलेट देतो, काही भेटवस्तू देतो किंवा काही प्रेमाचे निशाण समजल्या जाणाऱ्या गोष्टी देतो; पण हा दिवस साजरा करणाऱ्या अनेकांना माहितच नसतं की व्हॅलेन्टाईन्स डे 14 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो?

वृत्तानुसार व्हॅलेंटाईनचा उल्लेख 'ऑरिया ऑफ जैकोबस डी वॉराजिन' नावाच्या पुस्तकात आहे. हा दिवस रोममधील एका चर्चचे मुख्य धर्मोपदेशक सेंट व्हॅलेंटाईनच्या नावाने साजरा केला जातो. असे म्हटले जाते की सेंट व्हॅलेंटाईन यांनी जगभर प्रेम पसरवण्याचा विचार केला होता, परंतु रोममधील एका राजाला आवडले नाही कारण तो प्रेमविवाहाच्या विरोधात होता. प्रेमविवाह करणे म्हणजे त्याच्यानुसार धर्माच्या विरोधात जाणे होते.

सम्राट क्लाउडियसला असे वाटायचे की याच प्रेमामुळे रोममधले तरुण आपल्या बायका आणि कुटूंबांला सोडून सैन्यात भरती होण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे क्लाउडियसने रोममध्ये लग्न करण्यास बंदी घातली. पादरी चर्चचे मुख्य धर्मोपदेशक व्हॅलेंटाईन यांना सम्राटाची आज्ञा अन्यायकारक वाटू लागली. त्यांनी त्या विरोधात जाऊन सैन्यातील अनेक अधिकारी व सैनिकांचे प्रेमविवाह आयोजित केले. त्यामुळे सम्राटच्या विरुधात गेल्याचा गुन्हा धर्मोपदेशक व्हॅलेंटाईन यांच्यावर नोंदवण्यात आला आणि  14 फेब्रुवारी रोजी त्यांना फाशी देण्यात आली.

प्रेमाचे प्रसारण करणाऱ्या धर्मगुरूचा खूण केल्याप्रकरणी धर्मोपदेशक व्हॅलेंटाईन यांच्या नावाने 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून रोममध्ये साजरा करण्यात आला. तेव्हापासून रोममधून चालत आलेली संस्कृती सगळीकडे 14 फेब्रुवारीरोजी साजरी केली जाते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News