आईचं घरातलं वास्तव आणि आपला 'मदर्स डे'

धनश्री पाईकराव (यिनबझ)
Sunday, 12 May 2019

आईने आपल्याला  दिलेल्या या सुंदर आयुष्याबद्दल तिचे आभार मनण्याचा दिवस म्हणजे मातृदिन. 
आज जगभरात मातृदिन (मदर्स डे) उत्साहात साजरा होईल; पण मदर्स डे फक्त एकच दिवस असावा का? याबद्दल थोडं काही...

"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" हे वाक्य आपण ऐकलं आहेच; पण खरोखर कधी मानलं आहे का? आई सारखी ओरडत असते, हे करू नको ते करू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको अशी काळजीही ती करत असते. आपण नेहमीच आईबद्दल तक्रार करत असतो.

मला वाटते समुद्राची शाई, हिमालयाची लेखणी व आकाशाचा कागद करून आईची माया लिहून संपणार नाही म्हणूनच तर म्हणावसं वाटत "आई" हे दोन अक्षरे हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवली पाहिजे.

बालपणापासून ते तारुण्यापर्यंत आपल्या मुलांच्या सर्व व्यथा फक्त आणि फक्त आपली आईच समजू शकते. आपल्या चांगल्यासाठी आई रागावते; पण त्या मागच्या भावना; मात्र फार वेगळ्याच असतात. आईच्या मायेत इतकी ताकत असते की तिच्या रागापेक्षा अवखळपणे केलेले प्रेम अधिक लक्षात राहतं. तीने प्रेमाने माझ्या चेहऱ्यावरून फिरवलेला हात, मला जशाचा तासा आजही आठवतो. मी माझ्या आईला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकत नाही. कारण आईच्या अत:करणाची काळजी आणि प्रेम हे आईच्या तळमळीवरून लक्षात येते. 

जगातील कोणतीही जखम भरून काढता येईल; पण आईच्या विरहाची कमतरता कधीच भरून निघणार नाही. मग तो दिवस येतो आपण शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घराबाहेर पडतो, आता कोणी ओरडायला नाही, आता मज्जाच मज्जा असते ना खरचं मज्जा? हो पण पहिले दोन-तीन दिवसच, मग ते मेसचे जेवण नाहीतर घरी जेवन बनवताना चुकून कापलेले बोट आईची उणीव भासवून देत असते. आता तर मोठी झालेली आहे म्हणून अश्रू रोखते; पण नंतर ढसा ढसा रडते, कारण घरचे वेध लागलेले असतात.

आजच्या आधुनिक जगात आपण इंटरनेट, सोशल मीडियाच्या जाळ्यात असे काही गुणंतलोय की आई वडीलांचे प्रेम कधी दिसत नाही. ज्यांनी हजारो रुपये भरून, दागीणे गहान ठेऊन, कर्ज काढून इंग्लिश मीडियम शाळेत शइकायला धाडले. अशा आई वडीलांना इंग्रजी येत नसेल तर आपल्याला त्याची लाज वाटते? सोशल मीडियावर cool वाटण्यासाठी "happy mother's day", आईसोबतची सेल्फी आपण पोस्ट करतो; पण आईला काधी समोरासमोर विष नाही करत. 

आई स्वयंपाक घरात भांडी घासत असते आणि आपण सेल्फीवरचे लाईक्स मोजत असतो, कधीतरी स्वतःला एक प्रश्न विचारा की आई वडिलांची किंमत फक्त सेल्फी ऐवढीच राहिली आहे का? 

या 21 व्या शतकात स्त्रीयाही उच्च शिक्षण घेतात, घराबाहेर पडतात, नोकरी करतात, वडिलांसारखीच आईही घराची जबाबदारी घेत आहे, ती आता पुरुषांच्या समान आहे, मला तर नोकरी करून घर सांभाळणारी आई आहे, तिचे कौतुक मला कायमच वाटत राहील.

आपण भाग्यवान आहोत की, आपल्याला प्रेम व काळजी करणारे आई वडील आहेत. मग विचार करा त्या अनाथ मुलाचा. ज्यांचा विचार करण्यासाठी त्यांचे आई वडील नाहीत, आज ना उद्या ते आपली साथ सोडून निघून जातील. तेव्हा रडत बसण्यापेक्षा आज आपल्या आईवरचे प्रेम व्यक्त करा, घरकामात मदत कारा, तीच्या हातातील भाजीची पिशवी घ्या, त्या छोट्या छोट्या गोष्टीचा तिला खूप आनंद देऊन जातील. जेव्हा कमवायला लागू तेव्हा पहिल्या पगारातून आईसाठी एक साडी आणा. तिला साडीचे कौतुक नसते, पण त्यातून तिला तुमचं तिच्या प्रति असलेलं प्रेम कळतं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News