रोहित पवारांच्या बाबांना अनोख्या पध्दतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 June 2020

विकासात्मक दृष्टिकोन असलेलं, माती व पाण्याशी नाळ जुळलेलं आणि मोठं कर्तृत्व असूनही प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच दूर असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे वडील आदरणीय राजेंद्रदादा पवार. आज त्यांचा वाढदिवस. माझ्या व आईच्या सामाजिक, राजकीय वाटचालीतील एक मार्गदर्शक दुवा म्हणून त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका पार पाडली.

आज राजेंद्रदादा पवार यांचा वाढदिवस आहे. रोहित पवार यांनी आत्तापर्यंत जनतेच्या भल्यासाठी काय केलं, तसेच सद्या जनतेच्या कल्याणासाठी काय करत आहेत हे सोशल मीडियावर पोस्ट लिहून मांडलं आहे. रोहित पवारांना लहान असल्यापासून त्यांच्यावर कसे संस्कार केले आहेत. 

विकासात्मक दृष्टिकोन असलेलं, माती व पाण्याशी नाळ जुळलेलं आणि मोठं कर्तृत्व असूनही प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच दूर असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे वडील आदरणीय राजेंद्रदादा पवार. आज त्यांचा वाढदिवस. माझ्या व आईच्या सामाजिक, राजकीय वाटचालीतील एक मार्गदर्शक दुवा म्हणून त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका पार पाडली.

बाबा म्हणजे कामाशी प्रामाणिक निष्ठा असलेलं, शेती व पाण्याचा निरंतर अभ्यास करणारं प्रचंड क्षमता असलेलं एक प्रयोगशील व्यक्तिमत्व. लोकांसाठी काम करण्यातच त्यांनी नेहमी आनंद मानला. ज्या मातीत काही पिकत नाही तिथं कोणतं पीक घ्यावं जेणेकरून त्यातून शेतकऱ्यांना अधिकचे चार पैसे मिळावेत, यासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करतात. त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना प्रत्यक्षिकावर आधारित अनेक प्रयोग त्यांनी करून दाखवले व त्यांचं हे काम आजही अव्याहतपणे सुरू आहे. सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या मुलांसाठीही प्रगतीच्या, विकासाच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी त्यांनी सुरू केलेल्या 'कृषक' या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते प्रात्यक्षिकावर आधारित शेतीचे धडे देतात. बाबांविषयी खूप काही सांगता येईल, पण आज एवढंच सांगतो की पडद्यामागे राहून शेती, माती आणि पाणी या क्षेत्रांत डोंगरएवढं रचनात्मक काम उभं करणारा हिरो म्हणजे माझे बाबा.

अशा या सर्वार्थाने बाप माणसाला वाढदिवसानिमित्त माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या हातून शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची खूप मोठी सेवा घडो यासाठी त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News