सर सुखाची श्रावणी...

सुनिल पवार
Wednesday, 28 August 2019

खळखळ गं ओढीची
शांत लयीत धावते...
आशेच्या मलयातून
अवचित डोकावते...!!

सर सुखाची श्रावणी
झाली ओली  ती धरणी...
सात रंगाचे गं स्वप्न
माझ्या रुजले लोचनी...!! 

मन हिरवे पाचूचे
सय कोंदण गं होते...
शुभ्र दवाचे गोंदण
पानाफुलावर सजते...!!

खळखळ गं ओढीची
शांत लयीत धावते...
आशेच्या मलयातून
अवचित डोकावते...!!

सरीवर सर येते
मन सैरभैर होते...
माहेरच्या भेटीलागी
ओढ जीवास लागते...!!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News