लीजंडस्‌ ऑफ चेसद्वारे आनंदची मोहीम सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 July 2020
  • विश्वनाथन आनंद अखेर जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने घेतलेल्या बुद्धिबळ मालिका स्पर्धेत सहभागी होणार आहे.
  • चेस २४ लीजंडस्‌ ऑफ चेस स्पर्धेत तो खेळणार आहे.

मुंबई :- विश्वनाथन आनंद अखेर जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने घेतलेल्या बुद्धिबळ मालिका स्पर्धेत सहभागी होणार आहे. चेस २४ लीजंडस्‌ ऑफ चेस स्पर्धेत तो खेळणार आहे. त्याची सलामीला लढत पीटर स्वीडलरविरुद्ध होणार आहे.

साखळी पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेद्वारे स्पर्धात्मक लढतीत पुनरागमन होत आहे. या विविध वयोगटातील स्पर्धकांचा सामना करण्यास सज्ज आहे, असे आनंदने सांगितले. कोरोना आक्रमणामुळे तीन महिने जर्मनीत राहणे भाग पडलेल्या आनंदची मायदेशात आल्यानंतरची ही पहिलीच स्पर्धा आहे.
आनंदप्रमाणेच विश्वकरंडक विजेता स्वीडलरही प्रथमच या स्पर्धेत खेळत आहे. आनंदसमोर त्यानंतर जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला मॅग्नस कार्लसन, व्लादिमीर क्रामनिक, अनिश गिरी, पीटर लेको, इयान नेपोनैश्‍तची, बोरीस गेलफंड, डिंग लिरेन, वॅसिल इवानचूक यांचे आव्हान असेल. ही स्पर्धा ५ ऑगस्टपर्यंत होणार आहे.

कार्लसन, लिरेन, नेपोनैश्‍तची आणि गिरी यांनी चेसएबल मास्टर्स स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती, त्यामुळे त्यांना या स्पर्धेत प्रवेश मिळाला. ते ४२ ते ५० वयोगटातील लीजंडस्‌ बुद्धिबळपटूंना आव्हान देतील. या स्पर्धेतील विजेता ग्रॅंड फायनलसाठी पात्र ठरणार आहे. त्या लढतीसाठी तीन लाख डॉलरचे बक्षीस आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News