थॅलेसेमियाग्रस्त समृद्धीला लोकसहभागातून आर्थिक मदतीचा हात

सुरेश नागापूरे
Wednesday, 4 March 2020

समृद्धीवर शस्रक्रीया करण्यासाठी मदतीची गरज आहे. नागरिकांनी पुढे येऊन तीला सहकार्य करून सामाजिक उत्तरदायीत्व जपण्याची हीच ती वेळ आहे.
-पुरूषोत्तम जुजगर, सचिन, संत गजानन महाराज कॉन्हेंट,

पारस :  येथील संत गजानन महाराज इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केजी १ मध्ये शिकत असलेल्या समृद्धी सुनिल पांडेला थॅलेसेमिया हा आजार आहे. तीच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांनी तीच्यासाठी मदतीचे आवाहन केले. या आवाहनला प्रतिसाद देत नागरिकांनी समृद्धीच्या उपचारासाठी ३० हजारांची आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकी जपली.

समृद्धीवर पाच वर्षांपासून विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. तीच्या शरीरात हिमोग्लोबिन तयार होत नसल्यामुळे तीला सतत रक्तपुरवठ्याची गरज असते. यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून तीच्यावर शस्रक्रीया होणे गरजेचे आहे. त्यासाठी सुमारे १४ लाख इतका खर्च येते. पणं समृद्धीच्या घरची परिस्थिती हलाकीची असल्याने आई-वडिलांना तिच्यासाठी  सतत संघर्ष करावा लागतो. ही बाब समृद्धीच्या शाळेतील शिक्षकांना माहिती झाली. शिक्षक, विद्यार्थ्यांनी नागरिकांना तीच्या आजारासंदर्भातील गांभीर्य लक्षात आणून देत नागिरकांना समृद्धीसाठी आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले.

या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांच्या संयुक्त मदतीतून सुमारे ३० हजार रुपयांची आर्थिक मदत तीच्या उपचारासाठी जमा झाली. ही रक्कम मुख्याध्यापक मनोज लांडे, सहायक शिक्षक नीलेश सातव, सय्यद असलम, शिवाजी पंडितकर, जिशान अहमद, सुफियान अहमद, राजेश दिवनाले, तिलक भारंबे यांच्या उपस्थितीत समृद्धिच्या पालकांना सोपविण्यात आली.

समृद्धिला समृद्ध करण्यासाठी तुमचीही गरज 

पाच वर्षांपासून समृद्धी थॅलेसेमियाशी दोन हात करीत आहे. तीचे जीवन समृद्ध करण्यासाठी तुमच्याही मदतीची गरज आहे. त्यासाठी आपण सामाजिक बांधिकलकी जपत संत गजानन महाराज इंंग्लिश स्कुल पारसचे मुख्याध्यापक अथवा शिक्षक पालकांकडे आर्थिक मदत देऊ शकता.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News