केस गळतायेत? पाळा 'ही' पथ्ये 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020
 • तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पथ्ये पाळल्यास केसगळतीवर आपण नियंत्रण आणू शकतो.

केस गळणे ही सामान्य बाब आहे. मात्र गरजेपेक्षा जास्त केस गळत असतील तर मोठी समस्या असू शकते. केसांची काळजी घेतली नाही, तर मोठा परिणाम भोगावा लागू शकतो. काही जणांचे केस हे अनुवंशकतेमुळे देखील गळतात. तर काहीवेळा हवामान देखील केसगळतील कारणीभूत असतात. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पथ्ये पाळल्यास केसगळतीवर आपण नियंत्रण आणू शकतो. 

 • अंघोळ करताना अनेकजण गरम पाण्याचा वापर करतात. मात्र फार गरम पाणी वापरल्याने केसांना त्रास होऊ शकतो. प्रमाणापेक्षा अधिक गरम पाण्याने केस धुतल्यास केस कोरडे होतात, आणि गळून पडतात. त्यामुळे केस धुताना कोमट पाण्याचा वापर योग्य ठरतो. 
   
 • केस विंचरताना देखील अनेकदा केस ओढले जातात आणि तुटतात. त्यामुळे केस विंचरण्याची पद्धत देखील बदलून घ्यावी. केसांवरून जोरजोरात कंगवा फिरवू नये. त्यामुळे केसांची मुळे ओढली जातात, म्हणून केस विंचरताना मोठ्या दाताचा कंगवा वापरावा. केस हळुवार विंचरावे. 
   
 • केस धुतल्यानंतर ते कोरडे करताना हळुवार पुसावेत. काहीजण केस कोरडे करण्यासाठी मशीनचा वापर करतात. मात्र तस न करता ते आपोआप वाळवून द्यावे. 
   
 • आज प्रत्येक दिवसाला नवी हेअरस्टाईल करण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य तर खुलतेच त्यासोबतच नवीन लूक मिळतो. मात्र यासाठी केसांची फार ओढाताण  होणार नाही याची काळजी घ्यावी. 
   
 • हेअरस्टाईल करताना विजेवर चालणाऱ्या कोणत्याच यंत्राचा वापर करू नका. यामुळे केसांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे या उपकरणांचा वापर करणे टाळावे. 
   
 • केस गळतीचे महत्त्वाचे कारण म्हणजे तेल न लावणे. अनेकजण केसांना तेल लावत नाहीत. तरुणांमध्ये केसांना तेल लावणे म्हणजे आऊटडेटेड वाटते. मात्र केसांना तेलातूनच पोषण मिळत असते. मात्र तेल न लावल्याने केसगळती होऊ शकते.  
   
 • आरोग्याचा देखील केसांवर तेवढाच परिणाम होत असतो. त्यामुळे आहार योग्य घेणे फायदेशीर आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News