हेअर हेल्थ : गळणाऱ्या केसांसाठी "कापूर" आहे रामबाण इलाज; असा करा वापर  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 4 May 2020

आज प्रत्येकजण केसांशी संबंधित समस्यांशी झगडताना दिसत आहे. बदलती जीवनशैली या सर्व गोष्टींना कारणीभूत ठरत आहे. त्यावर अनेक उपाय करूनही फायदा होत नाही. यासाठी कापूर हा रामबाण उपाय आहे

आज प्रत्येकजण केसांशी संबंधित समस्यांशी झगडताना दिसत आहे. बदलती जीवनशैली या सर्व गोष्टींना कारणीभूत ठरत आहे. त्यावर अनेक उपाय करूनही फायदा होत नाही. यासाठी कापूर हा रामबाण उपाय आहे. घरातील पूजेच्या वेळी वापरलेला कपूर केसांना खूप फायदेशीर मानला जातो. केसांची वाढ होण्यासाठी गुणकारी आहे. यामुळे कोंड्याची समस्या दूर होते आणि केस जाड आणि मऊ होतात. जर आपण केसांच्या समस्येमुळे त्रस्त असाल आणि कोणत्याही प्रकारचे तेल किंवा शैम्पू काम करत नसेल तर कापूर वापरुन पाहा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल.

कापूर तेल औषधी गुणांनी परिपूर्ण आहे जे त्वचेत ब्लड सर्क्युलेशन वाढवते. हे तेल नियमितपणे लावल्यास केस वाढतात. आज आम्ही आपल्या केसांसाठी कापूरच्या चमत्कारिक फायद्यांविषयी सांगणार आहोत. चला ते कसे वापरायचे ते जाणून घेऊया ...

केसांच्या मजबुतीसाठी गुणकारी कापूर
पोषक तत्वांचा अभाव, जास्त ताण आणि प्रदूषण यामुळे केस कमकुवत होऊ शकतात, परंतु कापूर तेल आपल्या केसांना सामर्थ्य देण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. हे तेल कच्च्या अंडीमध्ये मिसळा आणि लावा. यासाठी कापूर तेलात कच्चे अंडे मिसळा आणि ते केसांवर, विशेषत: मुळांवर लावा. हे मिश्रण कमीतकमी १५-२० मिनिटे केसांमध्ये ठेवा आणि नंतर ते शैम्पू आणि कोमट पाण्याने धुवा.

केसांच्या वाढीसाठी कापूर आणि नारळ तेल
केस गळणे आणि टक्कल पडण्यासाठी कापूर चांगला आहे. कारण हे त्यांना पुन्हा वाढण्यास मदत करते आणि त्याच वेळी पातळ केस दाट करते. केस गळण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कपूर तेलाने मालिश करा. कापूर आणि नारळ तेल समान प्रमाणात मिसळा आणि आपल्या डोक्यावर आणि मुळांवर लावा. आपल्या केसांमध्ये 20-30 मिनिटे ठेवा. यानंतर केस शैम्पूने धुवा. चांगला परिणाम मिळविण्यासाठी आठवड्यातून दोनदा नियमितपणे हे करा.

डँड्रफसाठी कापूर 
डँड्रफ म्हणजे कोंड्यापासून तर प्रत्येकजण त्रस्त आहे. परंतु कापूर तेलाच्या मदतीने ही समस्या सहजपणे सोडविली जाऊ शकते. कापूरचे तेल केस धुण्यापूर्वी लावल्यास कोंड्यापासून मुक्ती मिळवता येते. कापूर तेलात नारळाचे किंवा एरंडाचे तेल मिसळल्यास केस हेल्थी राहण्यासाठी मदत मिळते. याशिवाय खाण्या-पिण्याच्या सवयीत हेल्थी पदार्थांचा वापर केल्यास देखील केसांना नैसर्गिकपणा मिळतो. याशिवाय कापूरच्या तेलाने नियमितपणे केसांना मालिश करणे देखील फायदेशीर ठरू शकते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News