20 हजार मजूरांच्या राहण्याची सोय करतोय 'हा' कलाकार; रोजगार उपलब्ध करुन देणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020

वीस हजार कामगारांना प्रवाशी रोजगार या संकेतस्थळामार्फत रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे तो सध्या चर्चेचा चेहरा झाला आहे.

मुंबई: सोनू सुद जनतेला मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतो, लॉडाऊन काळात लाखो कामगारांना सुदने मदतीचा हात दिला आणि विद्यार्थ्यांना परदेशातून मायदेशी परत आणले त्यामुळे तो समाजाचा रिअल हिरो बनला आहे. सोनू सूद एका नव्या कारणांमुळे सध्या चर्चेत आहे. 20 हजार कामगारांची नोयडामध्ये सुदने राहण्याची सोय केली आहे. या वीस हजार कामगारांना प्रवाशी रोजगार या संकेतस्थळामार्फत रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे तो सध्या चर्चेचा चेहरा झाला आहे.

 

याविषयी अधिक माहिती सुदने आपल्या इंस्टाग्राम वरुन दिली आहे. 'मला आनंद वाटतो की 20 हजार प्रवाशांच्या राहण्याची सोय मी करू शकलो, त्यांना नोएडा येथील कपड कारखान्यांमध्ये नोकरी मिळवून देऊ शकलो, त्यासाठी एनएईसीचे अध्यक्ष ललित ठकराल यांनी मोठी मदत केली' असे सोनूने  इंस्टाग्रामवर सांगितले. कामगारांना राहण्यासाठी उत्तम दर्जाची सोय करण्याचा प्रयत्न सुरू आहे असेही सोनु म्हणाला.

कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 'प्रवासी रोजगार' नावाचं ॲप सदने विकसित केले आहे. आतापर्यंत ॲपवर साडेचार लाख कामगारांनी नोंदणी केली. त्यापैकी अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात सोनुला यश आले आहे. त्यामुळे सोनू सुदकडे मदतीच्या मागणीचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. मला शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आश्वासन सुदने जणतेला दिले. ज्या मजूरांना रोजगाराची आवश्यकता आहे अशा गरजूंनी 'प्रवासी रोजगार' नावाच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्याचे आवाहन सुदने केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News