चित्रपटातला 'हा' अभिनेता वास्तवातला रियल हिरो; परदेशात आडकलेल्या १०१ विद्यार्थ्यांची केली सुटका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 August 2020

चेन्नईचे शंभर विद्यार्थी आणि दिल्लीचा एक असे १०१ विद्यार्थी आपल्या घरी सुखरुप परतले. विद्यार्थ्यांनी मायदेशात आल्यानंतर सुटकेचा श्वास घेतला आणि सोनू सूदनचे आभार मानले.

मुंबई : चित्रपटात काम करणारे हिरो वास्तवातले रियल हिरो बनले आहेत. त्यात सोनू सुदनचे नाव अग्रस्थानी आहे. लॉकडाऊनमध्ये लाखो कामगारांना सोनूने शक्य ती मदत केली. त्यामुळे सोनू सुदनेकडे जग भरातून मदतीच्या मागणीचा ओघ वाढला, अशा परिस्थितीत परदेशामध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांनी सोनूकडे मदतीची मागणी केली. सोनुने तात्काळ मदतीचा हात समोर केला. त्यामुळे परदेशात आडकलेले १०१ विद्यार्थी बुधवारी सुखरूप आपल्या मायदेशी परतले.

वैद्यकीय शिक्षणासाठी रशियात गेलेले १०१ विद्यार्थी मास्को शहरात अडकले होते. त्यांना भारतात घेऊन येण्यासाठी दोनशे प्रवाशी क्षमता असलेले एक चार्टर प्लेन तयार झाले. मात्र, १०१ विद्यार्थी असल्यामुळे चार्टर प्लेन भारतात घेऊन जाईल की नाही याची शास्वती नव्हती, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात चिंतेचे वातावरण पसरले होते. अशा परिस्थितीत अभिनेता सोनू सुदनकडे विद्यार्थ्यांनी मदतीची मागणी केली. सोनुने रिकाम्या असलेल्या ९० सीट बुक केल्या. त्यानंतर रशियाच्या मास्को शहरातून विमानाने आकाशात भरारी घेतली आणि थेट भारतात दाखल झाले. त्यात चेन्नईचे शंभर विद्यार्थी आणि दिल्लीचा एक असे १०१ विद्यार्थी आपल्या घरी सुखरुप परतले. विद्यार्थ्यांनी मायदेशात आल्यानंतर सुटकेचा श्वास घेतला आणि सोनू सूदनचे आभार मानले. परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांना सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

वंदे भारत अभियानाद्वारे परदेशात आडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी मास्को शहरातून ३ जुलै रोजी एक विमान रवाना झाले, मात्र विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण कालावधी ६ जुलै रोजी संपला, त्यामुळे विद्यार्थ्यांचे वंदे भारत अभियानाचा लाभ मिळू शकला नाही, शेवटी सेनू सदनने विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा खर्च उचलला. त्यामुळे सामाजिक भान जपणारा सोनू चर्चेचा विषय ठरला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News