जिममध्ये जाण बंद केलंय? होऊ शकतात हे दुष्परिणाम 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 February 2020
  • व्यायामाची सुरुवात करताना आपल्या शरीरात जसे चांगले बदल दिसून येतात त्याचप्रमाणे व्यायाम करणे बंद केल्यावर देखील त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. 

आजच्या तरुणाईला जिममध्ये जाण्याची मोठी क्रेझ असते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. धावणे, सायकलिंग, व्यायाम यांसारख्या गोष्टी करतात. जिममध्ये जाऊन वेगेवेगळे व्यायामप्रकार केले जातात. मात्र फार कमी जणांचे यामध्ये सातत्य टिकून राहते.

व्यायामाची सुरुवात करताना फार उत्साह असतो. पण काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे च पाहायला मिळते. यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. कामाचा ताण, प्रवास, इतर काही वैयक्तिक गोष्टींमुळे जिमला नियमित जाणे शक्य होत नाही. आणि हळू-हळू हा व्यायाम मागे पडत जातो. व्यायामाची सुरुवात करताना आपल्या शरीरात जसे चांगले बदल दिसून येतात त्याचप्रमाणे व्यायाम करणे बंद केल्यावर देखील त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. 

तज्ञांच्या माहितीनुसार, ज्या व्यक्ती नियमितपणाने व्यायाम करतात, जिमला जातात त्यांच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. एक आठवड्याचा फरक पडला तरी त्यांचे शरीर हळूहळू शिथिल होते. त्यांच्या स्नायूंमध्ये बदल होतात. काहींच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी खालावते. त्यांना चालताना किंवा धावताना देखील वेळ लागतो.  

यासोबतच व्यायाम सोडल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी वाढण्यास सुरुवात होते. फॅट सेल्सचे प्रमाण वाढल्याने शरीर स्थूल दिसू लागते. त्यामुळे शरीराचे वजनही वाढते. या सर्व गोष्टींचा परिणाम पचनक्रियेवर होतो. पचनक्रिया विस्कळीत झाल्याने त्याचा दुष्परिणाम झोपेवर होतो. त्यामुळे शरीराला व्यायाम मिळणे आवश्यक आहे.  

रोज कमी-जास्त प्रमाणात व्यायाम करणे सोयीस्कर ठरते. किमान ४५ मिनिटे व्यायाम केल्याने आपले शरीर आणि मन फ्रेश राहू शकते. आठ ते दहा तासांची झोप, संतुलित आहार, या सर्व गोष्टी निरोगी आयुष्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News