गुरूजींची विद्यार्थी शोधमोहिम ; विद्यार्थ्यासाठी नवीन अभ्यासक्रम

सुहास सदाव्रते 
Thursday, 6 June 2019


विद्यापीठ पातळीवर पदवी आणि पदव्युत्तर वर्गाचे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक वर्षापासून बदलणार आहे.बदलते समाज जीवन अन वैश्‍विक विचारावर अभ्यासक्रमाला प्राधान्य देण्यात आले आहे.
-डॉ.यशंवत सोनुने मराठी अभ्यास मंडळ 

जालना -  एका आठवड्यानंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे.परंतु यापूर्वीच विद्यार्थी शोधमोहिम व नॅकचे मूल्यांकन असल्याने शाळा-महाविद्यालयाचे कामकाज सुरू झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

प्रवेशप्रक्रिया 
नवीन शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी पटसंख्येसाठी पूर्व प्राथमिक तसेच इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्याची प्रवेशप्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झालेली आहे.जालन्यातील एका इंग्रजी शाळेचे प्रवेश मागील मार्च महिन्यातच ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करण्यात आले आहे.तर जाफराबाद तालुक्यातील डावरगाव देवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गाचे प्रवेश मार्चमध्येच पूर्ण करण्यात आले आहे हे विशेष.शहरातील बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील प्रवेशप्रकिया झालेली आहे.

सुटयातही कामकाज
प्राथमिक,माध्यमिक शिक्षणात विद्यार्थी पटसंख्या टिकून राहावी यासाठी अनेक शाळेतील शिक्षकांच्या सुट्या कमी करण्यात आलेल्या आहेत.शाळा 17 जून रोजी उघडणार असल्या तरी अनेक शाळेतील शिक्षक हे शाळा परिसरातील गावांना प्रत्यक्ष भेटी देवून विद्यार्थी शोधात फिरताना दिसून येत आहे.शहरातील वरिष्ठ महाविद्यालयात नॅक चे मूल्यांकन असल्यानेही प्राध्यापकांना सुटीत बोलावून कामकाज पूर्ण करून घेण्यासाठी महाविद्यालयांनी नियोजन केले आहे.

विद्यार्थी शोधमोहिम 
जिल्हयात इयत्ता पाचवी वर्गासाठी विद्यार्थी शोधमोहिम उन्हाळ्याच्या सुटीतच राबविण्यात आली आहे.खाजगी शाळेतील शिक्षकांची शोधमोहिम अनेक ठिकाणी सुरू असल्याचे चित्र आहे.पाचवी ते आठवीपर्यतच्या वर्गातील विद्यार्थी संख्येसाठी जिल्हा परिषदेसह खाजगी शाळांनाही समस्या मोठी भेडसावणारी आहे.जिल्हयात मंठा,परतूर,घनसावंगी या तालुक्यात स्थलांतरीत होण्याचे प्रमाण अधिक असल्याने शाळांना विद्यार्थी संख्येसाठी अनेक अडचणी निर्माण होत आहे. बारावीच्या निकालाच्या विद्यार्थी संख्येवर वरिष्ठ महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमाचे प्रवेश अवलंबून असल्याने शहरातील प्राध्यापक ग्रामीण भागात विद्यार्थी संख्येसाठी फिरताना दिसून येत आहे.

नवीन अभ्यासक्रम 
यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी व अकरावी तसेच विद्यापीठीय पातळीवर पदवी आणि पदव्युत्तर वर्गासाठी नवीन अभ्यासक्रम राहणार आहे.राज्य मंडळाने नुकतेच एक पत्र काढले असून दहावी- बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी शेवटची परीक्षेची एकच संधी देण्यात येणार आहे. विद्यार्थी ज्ञान आकलनक्षमतांचा विचार करूनच अकरावी वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News