'गन्स ऑफ बनारस' 28 फेब्रुवारीला प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 January 2020
  • 10 वर्षानंतर 'गन्स ऑफ बनारस' चित्रपटामधून अभिनेता करण नाथ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

शेखर सुरी दिग्दर्शित 'गन्स ऑफ बनारस' हा चित्रपट 28 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. बालपणापासून रुपेरी पडद्यावर झळकणारा कलाकार करण नाथ हा चित्रपटामध्ये गुड्डू शुक्लाची मुख्य भुमिका साकारणार आहे. साऊथच्या 'पोल्लाधवन' चित्रपटाचा 'गन्स ऑफ बनारस' हा हिंदी रिमेक आहे. त्यात कलाकार नतालिया कौर, अभिमन्यू सिंग, तेज सप्रू यांनी भूमिका साकराल्या आहेत. 

लहान वयातच करण नाथने ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात भुमिका केली होती. ती प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीला आली होती. त्यांनतर  पागलपन, ये दिल आशिकाना, तुम ए डेंजर्स, एलओसी कारगील, तेरा क्या होगा जॉनी अशा चित्रटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 10 वर्ष चित्रपट क्षेत्रापासून दूर राहीला होता. 10 वर्षानंतर 'गन्स ऑफ बनारस' चित्रपटामधून अभिनेता करण नाथ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण नाथ हा निर्माता राकेश नाथ यांचा मुलगा आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News