गुलाबांपासून मिळू शकते, चांगील झोप आणि चांगली कल्पाना शक्ती...

यिनबझ टीम
Sunday, 2 February 2020

जर्मनी-फ्रीबर्ग विद्यापीठातील संशोधनाचे प्रमुख जर्जन कॉर्नमीयर म्हणतात की, "आपण रोज फुलांचा वास घेत असू तर दररोजच्या जीवनात अतिशय उत्साहपुर्वक काम करू शकतो.

गुलाबाचा सुगंध चांगले वाचन करण्यासाठी आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यात उपयुक्त असल्याचे या प्रयोगात सिध्द झाले आहे. एका नवीन संशोधनातून ही बाब समोर आली आहे. सायंटिफिक रिपोर्ट्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखाच्या माध्यमातून एका प्रयोगाचा सारांश सांगितला आहे. इंग्रजी शब्दसंग्रह शिकणार्‍या दोन विद्यार्थ्यांवर एक प्रयोग करण्यात आला होता, त्यातील एक विद्यार्थी अभ्यास करण्याआधी गुलाबाचा वास घेत असे, तर दुसरा विद्यार्थी त्याशिवाय अभ्यास करत असे.

जर्मनी-फ्रीबर्ग विद्यापीठातील संशोधनाचे प्रमुख जर्जन कॉर्नमीयर म्हणाले की, "सुगंधाचा सहायक परिणाम दररोजच्या जीवनात अतिशय दृढपणे काम करतो आणि याचा उपयोग लक्ष्यित मार्गाने केला जाऊ शकतो." प्रथम लेखक आणि विद्यार्थी शिक्षक फ्रान्झिस्का न्यूमन यांनी दक्षिण जर्मनीतील एका शाळेच्या सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या 2 विद्यार्थ्यांवर हा प्रयोग केला.

चाचणी गटातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दसंग्रह शिकताना घरी त्यांच्या डेस्कवर गुलाब किंवा सुगंधी धूप लावण्यास सांगितले. तसेच रात्री बेडच्या शेजारी असलेल्या बेडसाईड टेबलवरही  असे साहित्य ठेवण्यास सांगितले.

दुसर्‍या प्रयोगात, शाळेत इंग्रजीच्या परीक्षेच्या वेळी त्यांना टेबलजवळ धूप लावण्यास सांगितले गेले. परीक्षेच्या निकालांची तुलना केली गेली, ज्यामध्ये धूप, गुलाबाच्या वासांच्या सहवासात असेलेला विद्यार्थी 30 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून पास झाला होता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News