गिनीज बुक : या आहेत जगातल्या टॉप 10 सुंदर महिला; भारताचा नंबर...

यिनबझ टीम
Monday, 3 February 2020

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि फोर्ब्स यांनी मिळून जगातल्या टॉप टेन सुंदर महिलांची यादी करायचा निर्णय घेतला.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि फोर्ब्स यांनी मिळून जगातल्या टॉप टेन सुंदर महिलांची यादी करायचा निर्णय घेतला. मात्र एखाद्या महिलेची सुंदरता आपण कशी ओळखू शकतो? यावर सगळ्यांनी प्रश्न उपस्थित केले; पण यावर लंडनच्या एका सेंटर फॉर एडवांस्ड फेशियल कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जरीच्या एमडी जूलियन डी सिल्वा यांनी एक उपाय काढला आहे.

सिल्वा यांनी 5 रेशो नावाचा एक ग्रिक फॉर्म्यूला सगळ्यांच्या समोर आणला. त्याच्यानुसार कंप्यूटराइज्ड फेशियल मॅपिंग नावाच्या यंत्राचा वापर करण्यात आला. याच्या माध्यमातून फेस रेशोदेखील दाखवता येतो आणि सुंदरतादेखील निवडता येते.

सिल्वा यांनी या पध्दतीला गोल्डन रेशो स्कोर्स असं नाव दिलं आहे. अशाच गोल्डन रेशो स्कोर्सच्या माध्यमातून टॉप टेन सुंदर महिलांची नावे आपण पाहाणार आहोत...

या यादीमध्ये 10 व्या स्थानावर ब्रिटनची मॉडेल आणि सिंगर कारा डेलेविंग्ने हिचे नाव आहे. जूलियन यांच्या गोल्डन रेशो स्कोर्सनुसार हिला 89.99% गुण मिळाले आहेत.
 

'रोर' आणि 'डार्क हॉर्स'सारख्या गाण्यांमधून हजारो फॅन्सच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अमेरिकन सिंगर कैटी पेरी या यादीत 9 व्या स्थानावर आहे. गोल्डन रेशेनुसार हिला 90.08% टक्के गुण मिळाले आहेत.

अमेरिका आणि इजरायलची नागरिकता मिळवणारी अमेरिकन अॅक्टर नताली पोर्टमॅनचं नाव या यादीत 90.51% गुणांनी 8 व्या स्थानावर आहे.

'अ‍ॅवेंजर' आणि 'लूसी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी अमेरिकन अॅक्टर स्कॉरलेट जॉनसन या यादीत 7 व्या नंबरवर आहे. तिला 90.91 % गुण मिळाले आहेत.

मॉडेलिंगनंतर ब्यूजिनेसमध्ये करिअर करणारी ब्रिटनची कॅट मॉस 91.05 % गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

अमेरिकेची प्रसिध्द गाईका टेलर स्विफ्ट या यादीत पाचव्या स्थानावर आहे, तिला यासाठी 91.64 % गुण मिळाले आहेत.

अमेरिकेची लोकप्रिय गायिका एरियाना ग्रांडे 91.81% गुण मिळवून या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

अमेरिकेची मॉडेल-अॅक्टर एंबर हर्डने गोल्डन रेशेमध्ये 91.85 % गुण मिळवले आहेत. सुंदर महिलांच्या यादीत ही अॅक्टर तिसऱ्या स्थानावर आहे.

अमेरिकन सिंगर बियोंसने 92.44 % स्कोर मिळवला आहे, त्यासोबतच ती या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

गोल्डन रेशोमध्ये अमेरिकन मॉडेल बेला हदीदला जगातील सर्वात सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण महिला म्हणून घोषित करण्यात आली आहे. या यादी तिने सर्वाधिक 94.35% गुण मिळवत पहिला नंबर मिळवला आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News