गुढीपाडवा स्पेशल पुरण पोळीची रेसिपी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 25 March 2020
आज गुढीपाडवा या दिवशी घराघरात पुरण पोळी केली जाते. म्हणूनच खास तुमच्यासाठी गुढीपाडवा स्पेशल पुरण पोळीची रेसिपी घेऊन आलो आहोत.

आज गुढीपाडवा या दिवशी घराघरात पुरण पोळी केली जाते. म्हणूनच खास तुमच्यासाठी गुढीपाडवा स्पेशल पुरण पोळीची रेसिपी घेऊन आलो आहोत.

साहित्य :-
४ वाट्या चण्याची डाळ
४ वाट्या साखर
१०० ग्रॅम सुंठ
१०-१२ वेलदोडे
अर्ध जायफळ
चवीपुरते मीठ
पाऊण किलो गव्हाचे पीठ
अर्धी वाटी तेल

कृती :-
प्रथम डाळ १ पातेल्यात घालून किती आहे ते पाहणे आणि त्याप्रमाणे साखर घेणे. वेलची, जायफळ बारीक करून घेणे. सुंठ पावडर विकत आणणे किंवा घरी करणे.

जितकी डाळ असेल त्याच्या दुप्पट पाणी ठेवणे आणि मोठ्या पातेल्यात शिजण्यास ठेवणे. गॅस मोठा करणे पण उतु जाऊ नये म्हणून त्यात मोठा चमचा अगर झारा ठेवणे. डाळ चांगली नरम होऊ देणे. सर्व डाळ शिजल्यावर एक दुसरे मोठे पातेले घेणे आणि त्यावर तांदळाची चाळण सरळ ठेवणे आणि सर्व डाळ त्यात ओतणे. खाली पातेलात डाळीचे पाणी पडेल आणि नंतर डाळ परातीत चाळणीवर ठेवून वाटी घेऊन बारीक करणे. सर्व डाळ बारीक झाल्यावर त्यात सुंठ, वेलची आणि जायफळ त्यात शेवटी टाकणे.

वाटलेली डाळ आणि साखर मिक्स करून गरम करण्यास गॅसवर ठेवणे. साखर टाकल्यावर डाळ पातळ होईल ती चटचट उडू लागेल, तेव्हा त्यात मीठ टाकणे. पुरण गरम करताना गॅस बारीक करून घेणे, आणि घट्ट होत आल्यावर चमच्यात पडेल इतपत घट्ट करणे. त्यानंतर सुंठ जायफळ आणि वेलची घालून हलविणे. हे पुरणपोळीसाठी पुरण तयार झाले.

जेव्हा डाळ शिजत टाकतो तेव्हाच गव्हाचे पीठ घेणे, थोडे त्यात मीठ घालणे आणि पाळसर मळणे. मळल्यानंतर तेल घालून चांगले मुरत ठेवणे. पोळ्या करण्याच्या आधी ३-४ तास झाकून ठेवणे. पोळ्या करण्यासाठी जे पीठ घेतो ते मैद्याच्या चाळणीने चाळून घेणे, तसेच लावायचे पीठही मैद्याच्या चाळणीने चाळणीने चाळून घेणे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News