खेळाडूंना शिबिरात सहभागी होण्यापूर्वी हमीपत्र बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 22 May 2020

केंद्रीय गृहमंत्रालयाने स्टेडियम सरावासाठी खुली करण्याचे ठरवले, पण क्रीडा मंत्रालयाने याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली नव्हती. ती आज खेलो इंडिया फिर से द्वारे जाहीर केली.

मुंबई : राष्ट्रीय क्रीडा शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक हमिपत्र लिहून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात कोरोना महामारी असताना सराव करण्याच्या धोक्‍याची आपल्याला जाणीव असल्याचे नमूद करावे लागणार आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने स्टेडियम सरावासाठी खुली करण्याचे ठरवले, पण क्रीडा मंत्रालयाने याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली नव्हती. ती आज खेलो इंडिया फिर से द्वारे जाहीर केली. ही पुस्तिका तब्बल 45 पानांची आहे. त्यात खेळांची थेट शरीर संपर्क, मध्यम शरीर संपर्क, संपर्काविना तसेच वॉटर स्पोर्टस्‌ या प्रकारांत विभागणी केली आहे. मध्यम शरीर संपर्क खेळांची दोन गटांत विभागणी करताना कमीत कमी संपर्क तसेच अप्रत्यक्ष संपर्क अशी विभागणी केली आहे.

सर्व प्रकारांतील खेळाडूंना शिबिरात सहभागी होण्यापूर्वी हमीपत्र द्यायचे आहे. त्यात सुरक्षित शिबिरासाठी केलेल्या उपाययोजनांची आपणास क्रीडा महासंघाने माहिती दिली आहे, तसेच कठोर उपाय केल्यानंतरही कोरोनाचा धोका पूर्णपणे जात नाही याची आपणास पूर्णपणे कल्पना आहे, तसेच या शिबिरात सहभागासाठी आपल्यावर कोणीही दडपण आणलेले नाही असे नमूद करायचे आहे. या पत्राचा नमुनाच तयार करण्यात आला आहे. त्यावर खेळाडूसह मार्गदर्शकांची स्वाक्षरी आहे; तर क्रीडा महासंघाने घोषणापत्र द्यायचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News