उन्हाळ्यात गॉगल्स्‌ची वाढती मागणी; तरुणाईत ब्रॅंडेडची क्रेझ  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 April 2019

सांगली ः दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता अधिकच जाणवू लागली. हा उन्हाळा आलाय, असं सांगणारं "सिम्बॉल' म्हणजे गॉगल्स्‌; पण इतकेच नसून बाराही महिने गॉगल्स्‌ वापरणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. फॅशनच्या जमान्यात याची न्यारीच क्रेझ आहे. सिनेमामध्ये कलाकारांनी घालेले गॉगल्सचीही चलती आहे. यासाऱ्यामध्ये ब्रॅंडेड गॉगल्सनी आपले मार्केट कायम ठेवले आहे.  उन्हाळ्याची चाहूल लागताच गॉगल्सना मागणी वाढते. त्यामुळेच शहरात ठिकठिकाणी गॉगल विक्रेत्यांचे स्टॉल्स सजले आहेत.

             उन्हाच्या तीव्रतेपासून बचावण्यासाठी लहान मुलांपासून वृद्धांपर्यांत साऱ्यांसाठी अनेक व्हरायटीचे गॉगल्स उपलब्ध आहेत. अगदी पन्नास रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत यांच्या किमती आहेत.  याशिवाय बाराही महिने गॉगल्स वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामध्ये तरुणाईत न्यारीच क्रेझ आहे. फॅशनमध्ये गॉगल या वस्तूला अधिक महत्त्व आहे. एखाद्या गॉगलची किंमत काय यापेक्षा आपण इतरांपेक्षा किती वेगळं दिसू याचा विचार करत गॉगल्स्‌वर गॉगल्स्‌ बदलताना तरुणाई दिसतेय. "नया है वह...' असाच विचार यंगस्तानची असतो. यामध्ये सिनेमाचा पगडाही अधिक दिसतोय. कलाकारांनी घातलेल्या गॉगल्सची फॅशनही तरुणाई अवलंबताना दिसते आहे. यामध्ये जुन्या काळच्या "डॉन' पासून आताच्या "दबंग' सिनेमापर्यंतच्या गॉगल्स्‌ना अधिक मागणी आहे. 

           अलीकडच्या फॅशन युगात ब्रॅंडेडचे "ऑप्टिकल वेअर'च्या शॉपी शहरात ठिकठिकाणी उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये रेबॅन, फास्ट ट्रॅक यांच्या अनेक कंपन्या दाखल झाल्या आहे. येथे अनेक प्रकारच्या व्हरायटी उपलब्ध झाल्या आहे. यात हजार रुपयांपासून ते 10-12 हजार पर्यंत गॉगल्स्‌ आहेत.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News