वाढती गर्दी हेच अजिंठ्यापुढील आव्हान! 

संकेत कुलकर्णी
Sunday, 28 April 2019

पर्यटक संख्येवर नियंत्रणासाठी उपाययोजनांची गरज 

औरंगाबाद - गेली दोन हजार वर्षे ऊन, वारा, पावसाचा मारा झेलणारी अजिंठा लेणी ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ याने जगाच्या नकाशावर आणली, या ऐतिहासिक घटनेला रविवारी (ता. 28) तब्बल 200 वर्षे पूर्ण होत आहेत. हवामानातील अनिश्‍चित बदल आणि पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे लेणीतील संवेदनशील झालेली चित्रे जपण्याचे मोठे आव्हान पुरातत्त्वज्ञांपुढे उभे आहे. 

ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ याला वाघूर नदीच्या खोऱ्यात अजिंठा लेणी सापडल्याच्या घटनेला रविवारी (ता. 28) तब्बल 200 वर्षे पूर्ण होत आहेत. दोन हजार वर्षांपूर्वीच्या भारतातील बौद्धकाळातील उज्ज्वल इतिहासाचा सर्वोत्कृष्ट चित्र-शिल्पपट असलेल्या या लेणीला दिवसाकाठी सरासरी दहा हजारांहून अधिक देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. 

इतक्‍या मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे लेणीतील आर्द्रता, उष्णता वाढून चित्रांवर दुष्परिणाम होत असल्याचे अभ्यासांतून समोर आले आहे. त्यामुळे ज्या लेणीत चित्रे आहेत, तेथील पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाधिक चांगल्या पर्यायांचा शोध घेणे अत्यावश्‍यक बनले आहे. 

भविष्यातील दिशा काय असावी? 
टालियन तज्ज्ञांच्या अहवालानुसार, चित्रे असलेल्या प्रमुख सहा लेणींत दिवसाला 100 पेक्षा अधिक पर्यटकांना प्रवेश देऊ नये.
या सहा लेणींसाठी वेगळी तिकिटे लावली जावीत. त्यापैकी 50 ऑनलाइन आणि 50 तिकिटे थेट येणाऱ्या पर्यटकांसाठी राखीव ठेवावीत.
बाकीच्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी फर्दापूरला उभारलेले अभ्यागत केंद्र सुरू करावे. त्यात उत्तम प्रदर्शन असावे. 
अभ्यागत केंद्रात गर्दी झाल्यास लेणीवरील भार कमी होईल; शिवाय एमटीडीसीचे बंद पडलेले उत्पन्न सुरू होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News