'ही' पुण्याची हरित की धुकित क्रांती?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

पुण्याची वाढती लोकसंख्या, बेसुमार वेगाने वाढणारी वाहनांची संख्या, रस्त्यारस्त्यांवर जाळण्यात येणारा कचरा, अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीतही गेल्या वर्षी ३६५ पैकी १६८ दिवस शहरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक होती; तर १०३ साधारण दिवस होती.

पुणे - पुण्याची वाढती लोकसंख्या, बेसुमार वेगाने वाढणारी वाहनांची संख्या, रस्त्यारस्त्यांवर जाळण्यात येणारा कचरा, अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीतही गेल्या वर्षी ३६५ पैकी १६८ दिवस शहरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक होती; तर १०३ साधारण दिवस होती.

त्यामुळे २७१ दिवस पुणे ‘ग्रीन’ असा निष्कर्ष भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेतील (आयआयटीएम) ‘सफर’ या प्रकल्पातून निघाला आहे. पुण्यासह दिल्ली, मुंबई, अहमदाबाद येथील हवेची गुणवत्ता ‘सफर’तर्फे सातत्याने मोजली जाते. त्याच्या गेल्या वर्षीच्या विश्‍लेषणातून ही माहिती पुढे आल्याचे प्रकल्पाचे प्रमुख डॉ. गुफरान बेग यांनी सांगितले.

पुण्यातील हवाप्रदूषण
सल्फर संयुगे, नायट्रोजन संयुगे, धूलिकण (पी. एम. १०), अतिसूक्ष्म धूलिकण (पी. एम. २.५), कार्बन मोनॉक्‍साईड यातून शहरातील हवा प्रदूषित होते. 

सल्फर संयुगे -
लाकूड, कोळसा, पेट्रोलियम पदार्थाच्या ज्वलनातून सल्फर संयुगे बाहेर पडतात. यात सल्फरडाय ऑक्‍साईडचे प्रमाण सुमारे ८० टक्के असते. पुण्यातील खासगी वाहनांची संख्या हे हवेतील प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण आहे. याचे हवेतील प्रमाण ५० मिली ग्रॅम प्रतिघन मीटरपेक्षा जास्त नसावे. पण, प्रत्यक्षात हडपसर येथे ही पातळी ६० मिलिग्रॅम प्रतिघन मीटरपेक्षा जास्त नोंदली गेली आहे.

वाहनांची वाढती संख्या -
पुण्याची वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस कोंडीत अडकत असलेली आपण पाहतोय. ‘अशक्त’ झालेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि त्याला पर्याय म्हणून उभी राहणारी खासगी वाहनांची संख्या ही वाहतूक व्यवस्थापनातील सर्वांत मोठी डोकेदुखी ठरतेय आणि हेच शहरातील हवा प्रदूषित होण्यामागचे प्रमुख कारण म्हणून समोर येतेय. पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात मार्च २०१६ मध्ये ३१ लाख सात हजार ९६२ वाहनांची नोंद झाली होती. अवघ्या वर्षभरात ही संख्या ३३ लाख ३७ हजार ३७० झाली. तर, उच्चांकी मार्च २०१८ मध्ये ३६ लाख २७ हजार २८० नोंद झाली. त्यात दुचाकींचे प्रमाण २७ लाख तीन हजार १४७ नोंदली गेली आहे. चारचाकी वाहनांची संख्या ८ लाख ७० हजार ९०६ पर्यंत असून, ५३ हजार २२७ रिक्षा आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News