इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिज फलंदाजांची उत्तम कामगिरी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 July 2020

दिवसागणिक बदल होणाऱ्या हवामानाप्रमाणे वेस्ट इंडिजच्या फलंदाजीतही प्रगती झाली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत त्यांनी 3 बाद 159 अशी मजल मारली.

लंडन:  दिवसागणिक बदल होणाऱ्या हवामानाप्रमाणे वेस्ट इंडिजच्या फलंदाजीतही प्रगती झाली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत त्यांनी 3 बाद 159 अशी मजल मारली.

चेंडूच्या लकाकीसाठी लाळ लावायला बंदी असल्यामुळे इंग्लंडने पाठीवर येणारा घाम लावून चेंडू चमकवण्याचा प्रयोग केला; पण स्वच्छ हवामानात चेंडू त्यांच्या अपेक्षेएवढा स्विंग होत नव्हता. या संधीचा वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी फायदा घेतला.

इंग्लंडकडे जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, मार्क वूड असे निष्णांत वेगवान गोलंदाज आहेत; पण संघाला दिलासा देणारी कामगिरी कर्णधार बेन स्टोक्‍स आणि डॉम बेस यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवून केली. वेस्ट इंडिजकडून सलामीवीर क्रेग ब्राथवेटने जोरदार प्रतिकार करत 65 धावांची खेळी केली. शेय होपने मात्र निराशा केली; मात्र या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला.

उपाहाराला काही वेळ शिल्लक असताना ब्राथवेटचा अडसर स्टोक्‍सने दूर केला; पण स्टोक्‍सने लगेचच नव्या फलंदाजासाठी अनुभवी गोलंदाज आक्रमणावर लावले नाही, याचा फायदा शामाह ब्रुक्‍स आणि रॉस्टन चेस यांनी घेतला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News