नाबार्डमध्ये नोकरीच्या उत्तम संधी, लाखात पगार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 August 2020
  • तुम्ही नोकरी शोधत आहेत, सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.
  • नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने (नाबार्ड) आपल्या मुंबई येथील NABFOUNDATION कार्यालयात असिस्टंट मॅनेजर पदासाठी नॉटिफिकेशन जारी केले आहे.

तुम्ही नोकरी शोधत आहेत, सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने (नाबार्ड) आपल्या मुंबई येथील NABFOUNDATION कार्यालयात असिस्टंट मॅनेजर पदासाठी नॉटिफिकेशन जारी केले आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ सप्टेंबर २०२० आहे.

शैक्षणिक पात्रता :

उमेदवाराने मान्यता प्राप्त कॉलेजमधून सोशल वर्क ((MSW) आणि एमए डेव्हलपमेंट स्टडिज किंवा रुरल डेव्हलपमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असणे गरजेचे आहे. याशिवाय उमेदवाराकडे सामाजिक क्षेत्रातील प्रकल्पात कामाचा जवळपास ५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

वय :

इच्छुक उमेदवाराचे वय किमान ३० वर्ष आणि कमाल ५० वर्ष असणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया :

उमेदवारांच्या योग्यता, अनुभवाच्या आधारावर १:१० या प्रमाणात मुलाखतीच्या आधारावर निवड केली जाईल. मुलाखतीनंतर नाबार्डची  सांकेतस्थळावर  www.nabard.org वर निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

पगार :

निवड झालेल्या उमेदवारांना ८०  हजार ते १ लाख रुपये प्रति महिना एवढा पगार मिळेल.

अर्ज प्रक्रिया :

०७ सप्टेंबर २०२० पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला बायोडाटा careers.nabfoundation@gmail.com  यावर पाठवू शकतात. उमेदवार अर्ज प्रक्रिया आणि अधिक माहितीसाठी नाबार्डच्या सांकेतस्थळाला देखील भेट देऊ शकतात.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News