'या' बॅंकेत नोकरीची उत्तम संधी, २५०० जगांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 September 2020
  • पदवीधरासाठी आनंदाची बातमी आहे.
  • तुम्ही कोणत्याही विषयात जरी पदवीधर झाले असला तरी तुम्हाला सरकरी नोकरची सुवर्णसंधी आहे.

मुंबई :- पदवीधरासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही कोणत्याही विषयात जरी पदवीधर झाले असला तरी तुम्हाला सरकरी नोकरची सुवर्णसंधी आहे. खासकरून बँकेत नोकरी करण्यास इच्छूक असणारे या संधीचा फायदा घेऊ शकतात. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (आयबीपीएस) देशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये क्लर्क पदासाठी हजारो जागांची भरती करणार आहे.

यासाठी नॉटिफिकेशन जारी करण्यात आले असून, एकूण २५५६ जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ३७१ पदांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या तारखा :–

 

  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – ०२ सप्टेंबर २०२०
  • ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख – २३ सप्टेंबर २०२०
  • अर्जाची फी भरण्याची अंतिम तारीख – २३ सप्टेंबर २०२०
  • कॉल लेटर डाऊनलोड करण्याची तारीख – १८ नोव्हेंबर २०२०
  • पुर्व परीक्षा – ५, १३ आणि १३ डिसेंबर २०२०
  • पुर्व परीक्षेचा निकाल – ३१ डिसेंबर २०२०
  • मुख्य परीक्षा – २४ जानेवारी २०२१

अर्ज शुल्क :–

जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ८५० रुपये आहे. तर एससी/एसटी, दिव्यांग उमेदवारांसाठी १७५ रुपये आहे.

शिक्षण आणि वयाची अट :–

इच्छुक उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराचे वय किमान २० आणि कमाल २८ वर्ष असणे गरजेचे आहे. आरक्षित वर्गांना वयात सूट मिळेल.

निवड प्रक्रिया :

उमेदवारांची निवड पुर्व व मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारावर केली जाईल. दोन्ही परीक्षा ऑनलाईन होतील. अधिक माहितीसाठी आणि नॉटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा. अर्ज करण्यासाठी  https://ibpsonline.ibps.in/  या लिंकला भेट द्यावी.

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News