पोलिसांसमोर आजी म्हणते 'प्यार किया तो डरना क्या'... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 January 2020

नवल म्हणजे या साठवर्षांच्या आजींना चक्क सात मुलं असून आजीला नातवंड आणि पतवंडे देखील आहेत.

आग्रा : प्रेमाला वयोमर्यादा नसते हे अगदी खरं आहे. चक्क एक साठ वर्षांची आजी बावीस वर्षाच्या युवकाच्या प्रेमात पडली आहे. ही घटना घडली आहे ती म्हणजे उत्तर प्रदेश मधील आग्र्यामध्ये. नवल म्हणजे या साठवर्षांच्या आजींना चक्क सात मुलं असून आजीला नातवंड आणि पतवंडे देखील आहेत.मात्र  22 वर्षीय युवकाच्या पत्नीला दोघांच्या प्रेमसंबंध बाबत समजल्यानंतर तिने थेट पोलिस स्टेशन गाठलं. पत्नीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला मात्र यावेळी आजीचे दिलेले उत्तर ऐकून पोलीस देखील चक्रावले. आजी म्हणाल्या की 'प्रेम करणे हा काही गुन्हा आहे का, हा तर माझा प्रियकर आहे'. 

पोलिसांनी चौकशीसाठी युवकाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. आजीही त्या युवकाच्या मागे मागे पोलीस स्टेशन मध्ये पोहोचल्या. प्रेम करणं गुन्हा आहे का असं पुन्हा उत्तर देत, गुन्हा झाला असेल तर त्याला जामीन देण्यासाठी मी इथे आली आहे असं ठणकावून पोलिसांना सांगितलं. युवकाच्या मागे आजी खंबीरपणे उभी होती. पोलिसांना प्रश्न पडला नेमकं करावं तरी काय शेवटी वैतागून पोलिसांनी योगाला समज दिला आणि घरी परत पाठवून दिलं. जर पुन्हा तुझ्या पत्नीने तक्रार केली तर तुला अटक केली जाईल असा सज्जड दमही पोलिसांनी दिला. मात्र आग्रा शहरातील प्रकाश नगर मध्ये या प्रेम कहानी ची जोरदार चर्चा रंगली आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News