दानवेंच्या प्रतिष्ठेसाठी नात युवराज्ञीनेही कंबर कसली

लक्ष्मण सोळुंके
Tuesday, 26 February 2019

यंदा जालना लोकसभेची निवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आधी दोन वेळा आमदार आणि त्यानंतर सलग ४ वेळा जालना लोकसभा मतदार संघातून खासदार राहिलेल्या दानवेंपुढे त्यांचे कट्टर आणि कडवे विरोधक शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. याशिवाय विदर्भातील नेते बच्चू कडू यांनी देखील दानवे यांच्या विरोधात जालना लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

अशा परिस्थितीत सगळेच विरोधक एकत्र येऊन दररोज नवनवीन शड्डू ठोकत असल्याने दानवे यांनी देखील प्रत्येक विरोधकाला भाषणातील टिकेच्या प्रहारातून उत्तर देणे सुरूच ठेवले. मात्र येणारी निवडणूक आतापर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकींपेक्षा आव्हानात्मक असल्याचे लक्षात आल्याने भाजपच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरील सर्वच नेत्यांनी राज्यभरात ‘अपना परीवार भाजपा परीवार’ ही मोहीम युद्धपातळीवर हाती घेऊन राज्यभरातील सर्वच भाजपा कार्यकर्त्यांच्या घरावर भाजपचा झेंडा लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

भाजपच्या ‘अपना परीवार भाजपा परीवार’ या मोहिमेत दानवे यांची नात आणि आमदार संतोष दानवे यांची लेक असलेल्या युवराज्ञीने देखील अडचणीच्या काळात खारीचा वाटा उचलत आजोबांच्या पाठीशी उभे राहण्याचा चंग बांधल्याच दिसत आहे. भाजपचा झेंडा हाती घेतल्याचा युवराज्ञी हिचा एक फोटो सोशल मिडीयावर कार्यकर्त्यांनी व्हायरल केला आहे. या फोटोत दानवे यांची नात युवराज्ञी सायकलवर बसलेली असून तिच्या हातात भाजपचा झेंडा दिसत आहे.सध्या हाच फोटो सोशल मिडिया वर फिरत असून दानवे यांची नात अडचणीच्या काळात आजोबांच्या पाठीशी उभी असल्याचे सांगितले जाऊन दानवे यांना पुन्हा लोकसभेत पाठवण्याचे आवाहन कार्यकर्त्याकडून केले जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News