अशोक सराफ यांची डिजिटल प्लॅटफॉर्म वर इंनिंग सुरु फेसबुक , इंस्टाग्रामवर करणार बॅटिंग 

स्वप्नील नावडकर
Saturday, 4 January 2020

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते अशोक सराफ आणि  आपले लाडके अशोक मामा हे लवकरच आपल्याशी संवाद साधणार आहेत तेसुद्धा फेसबुक वरून. अशोक सराफ हे आता फेसबुकवर आपले मत मांडणार असून त्यांनी इंस्टाग्रामवर देखील आपली बॅटिंग सुरु केली आहे.

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते अशोक सराफ आणि  आपले लाडके अशोक मामा हे लवकरच आपल्याशी संवाद साधणार आहेत तेसुद्धा फेसबुक वरून. अशोक सराफ हे आता फेसबुकवर आपले मत मांडणार असून त्यांनी इंस्टाग्रामवर देखील आपली बॅटिंग सुरु केली आहे.

लवकरच अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा "प्रवास" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आपल्या चित्रपट प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सोशल मीडियामध्ये एंट्री केल्याचं बोलले जात आहे. प्रवास या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर  पब्लिसिटी होत असून प्रवास हा चांगलीच कात टाकणार असं म्हंटलं जातंय.  

फेसबुकवर ashoksarafofficial या नावाने त्यांचं अकाऊंट ओपन  केला असून इन्स्टाग्रामवर #realashoksaraf या नावाने त्यांचं अकाउंट आहे.

अशोक सराफ हे लवकरच सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार असे सांगण्यात येत होते अखेर आपल्या चाहत्यांची इच्छच पूर्ण करत अशोक मामाने इंस्टाग्रावरदेखील उडी घेतली आहे. 
त्यामुळे त्यांचे प्रेक्षक हे सध्या बरेच खुश आहेत.

त्यामुळे विनोदवीर अशोक सराफ पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवणार का याची उत्सुकता लागली आहे  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News