होमगार्डच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष; आझाद मैदानात तरुणांचे आंदोलन

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा-यिनबझ)
Monday, 24 February 2020

मुंबई : तुटपुंज्या मानधनावर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्डने आझाद मैदानात सोमवारपासून (ता. 24) आंदोलनाला सुरुवात केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण होमगार्डंने आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अनेक महिन्यापासून होमगार्डना मानधन मिळाले नाहीत. त्यांचे थकीत मानधन देण्यात यावे, सरकारने काही होमगार्डंना कामावरुन कमी केले त्यांना पुन्हा रुजू करण्याचे आदेश द्यावे, 365 दिवस होमगार्डना रोजगार उपलब्ध व्हावा अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहे.

मुंबई : तुटपुंज्या मानधनावर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्डने आझाद मैदानात सोमवारपासून (ता. 24) आंदोलनाला सुरुवात केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण होमगार्डंने आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अनेक महिन्यापासून होमगार्डना मानधन मिळाले नाहीत. त्यांचे थकीत मानधन देण्यात यावे, सरकारने काही होमगार्डंना कामावरुन कमी केले त्यांना पुन्हा रुजू करण्याचे आदेश द्यावे, 365 दिवस होमगार्डना रोजगार उपलब्ध व्हावा अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहे. माजी मंत्री महादेव जानकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. 

अनेक वर्षापासून होमगार्ड संघटना आपल्या मागण्या सरकारपुढे मांडत आहेत मात्र, युती आणि आघाडी दोन्ही सरकारने होमगार्डच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले होतो. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार होमगार्डच्या मागण्या मान्य करतील असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला. 

होमगार्डना मागील पाच महिन्यापासून भत्ते मिळाले नाहीत. उत्तर प्रदेश आणि मध्ये प्रदेश राज्यांनी होमगार्डमध्ये अनेक चांगले बदल केले आहेत ते बदल महाराष्ट्र सरकारने स्विकारावेत. होमगार्ड आंदोलकांनी केलेल्या मागण्या योग्य आहेत त्याच्या मागण्या महाविकास आघाडीने मान्य कराव्यात. होमगार्डंना समर्थन देण्यासाठी आंदोलनात सहभागी झालो.
-
अॅड. विजय इंगोले, होमगार्ड आंदोलक- समर्थक

गृह विभागाचा ताण कमी करण्यासाठी होमगार्डंना 200 दिवस काम दिले पाहीजे असा प्रस्ताव प्रथमचं मंत्रिमंडळात मांडला होता. होमगार्डांच्या मागण्या योग्य आहेत. त्यामुळे सरकारने होमगार्डच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा भाजप सरकारन सत्तेवर आल्यानंतर होमगार्डच्या मागण्या मान्य करु.
-
महादेव जानकर, माजी पदूम मंत्री

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News