शासकीय नोकरीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सर्व नोकऱ्यांसाठी 'ही' एकचं परीक्षा होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 August 2020

केंद्र सरकार राष्ट्रीय भरती संस्था ( National Recruitment Agency ) स्थापन करणार आहे. उच्छूक उमेदवारांना नोकरीसाठी संस्थेच्या संकेतस्थळावर एकदा नोंदणी करावी लागणार आहे.

नवी दिल्ली : शासकीय नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसंदर्भात केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. यापुढे विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागाची वेगवेगळी परीक्षा द्यावी लागणार नाही, सर्व विभगांसाठी एकच परीक्षा घेतली जाणार आहे, त्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय भरती संस्था ( National Recruitment Agency ) स्थापन करणार आहे. उच्छूक उमेदवारांना नोकरीसाठी संस्थेच्या संकेतस्थळावर एकदाचं नोंदणी करावी लागणार आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर नोकर लागेपर्यंत पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा, श्रम आणि परीक्षेची टककट कमी होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नॅशनल रिक्वायरमेंट एजन्सी संदर्भात अधिक माहिती दिली. 'युवकांना नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज करावा लागतो, त्यानंतर अभ्यास करून परीक्षा द्यावी लागते, प्रत्येक विभागाच्या नोकरीला दर वेळी परीक्षेतून जावे लागते, त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, यावर केंद्र सरकारने सर्व परीक्षेसाठी एकचं कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट ( Common Eligibility test ) घेण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला. विद्यार्थ्यांना यापुढे एकच परीक्षा द्यावी लागेल' असे मत जावडेकर यांनी व्यक्त केले. 

पुढे बोलताना जावडेकर म्हणाले की, यासोबत मंत्रिमंडळामध्ये आणखीन एक निर्णय घेण्यात आला. देशातील सहा विमानतळांचे व्यवस्थापन एका खाजगी कंपनीकडे देण्यात येणार आहेत, त्यामुळे जनतेला चांगल्या सोयी सुविधा मिळतील असे जावडेकरांनी सांगितले. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले, मात्र या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते यावर सीईटीचे यश आणि अपयश अवलंबून आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News