सीमा भागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन सरकार 'हा' प्रकल्प सुरु करणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 July 2020

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संचालित नवीन शासकीय मराठी महाविद्यालय स्थापन करण्यात येत आहे.

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संचालित नवीन शासकीय मराठी महाविद्यालय स्थापन करण्यात येत आहे. या महाविद्यालयाच्या कामाला अधिक गती द्यावी, यासाठी आवश्‍यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सीमा भागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी नवीन शासकीय मराठी महाविद्यालय स्थापन करण्यासंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी सामंत म्हणाले, सीमा भागात महाविद्यालये लवकर स्थापन करणे, तिथे शैक्षणिक सुविधा निर्माण करणे गरजे आहे. त्यासाठी उपलब्ध जागेची पाहणी करून घेणे, अभ्यासक्रम तयार करणे, याबाबतचा तातडीने आराखडा तयार करावा.

सीमा भागातील मराठी भाषिक बांधवांशी चर्चा करून शिक्षणासाठीच्या त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून घेऊन त्यांच्या गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक आराखडा तयार करणे आवश्‍यक आहे. सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांना अधिक दर्जेदार शिक्षण या महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावे, असेही सामंत यांनी यावेळी संगितले. बैठकीला आमदार ऋतुराज पाटील, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, दीपक पवार उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News