मराठा आरक्षणासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करणार; कार्यकर्त्यांनो आंदोलनाची मशाल हाती घेऊ नका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 13 September 2020
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगीती दिली, त्यामुळे मराठा समाजात असंतोष पसला. असंतोषाची धग आंदोलनातून व्यक्त केली पाहीजे, असा नवा सुरु मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे 'एक मराठा, लाख मराठा' सारखे पुन्हा आंदोनल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. 'मराठा आरक्षण टिकले पाहीजे यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या सारख्या गंभीर परिस्थितीत मराठा कार्यकर्त्यांनी आदोलनाची मशाल हाती घेऊ नये असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांना केली.

'न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू सरकार अतिषय खंबीरपणे मांडत आहे. त्यासाठी गेल्या सरकारने नेमून दिलेले वकील कायम ठेवण्यात आले. गरजेनुसार वकीलांमध्ये वाढ करण्यात आली. त्याचबरोबर काही सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकील लावले आहे. न्यायालयात आम्ही आरक्षणची बाजू मांडण्यास कसोसीने प्रयत्न करत आहोत, देशातील नामवंत विधीतज्ज्ञांशी चर्चा करुन एक आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगीती दिली तरी विविध न्यायमुर्तींच्या बॅंच समोर आरक्षणाची बाजू मांडण्याची संधी दिली. त्यात यश निश्चित येईल असा आशावाद मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.  

कोरोनाच्या पाश्वभुमीवर सोशल मीडियाच्या माध्यामातून मुख्यंमत्र्यांनी राज्यातील जनतेशी सुसंवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणावर सविस्तर माहिती दिली. मराठा आक्षणासंदर्भात कोणीही समाजामध्ये गैरसमज पसरवू नयेत असा मोलाचा सल्ला जनतेला दिला. 'राज्याती प्रमुख नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजणिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते, सामाजिक संस्था यांच्याशी आरक्षणासंदर्भात चर्चा केली, त्याची मते जाणून घेतली. सर्वांनी सरकारला लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावर सविस्तर विचार करुन काय भुमीका मांडली पाहिजे हे सर्वानुमते ठरवले जाईल, त्यानंतर सरकार न्यायावयात आरक्षणची बाजू मांडणार आहे असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News