महाविद्यालयीन परीक्षेसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 8 May 2020

विद्यार्थ्यांच्या परीक्षा संदर्भात सर्व विद्यापीठांचे कुलगुरु, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने राज्य सरकारकडे आपला आहवाल सादर केला.

मुंबई : यंदा महाविद्यालयीन परीक्षा 'होणार की नाही?' या प्रश्नाला आता पुर्णविराम मिळाला आहे. पदवीच्या प्रथम, द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करुन त्यांना होम असायमेंन्ट दिले जाणार आहे आणि पुढील वर्षात प्रवेश मिळणार आहे. अंतीम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुर्वीप्रमाणे घेतली जाणार आहे असे मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सावंत यांनी गुरुवारी व्यक्त केले.

परीक्षेसंदर्भात समितीने दिलेला आहवाल दोन दिवसात राज्यपालांकडे सादर केला जाईल. परीक्षा कशा घ्यायच्या या संदर्भात अंतिम निर्णय राज्यपाल घेतील. त्यानंतर कॅबिनेटमध्ये हा अहवाल ठेवला जाईल आणि मुख्यमंत्री परीक्षेविषयी घोषणा करतील उदय सावंत यांनी सांगितले.  

विद्यार्थ्यांच्या परीक्षा संदर्भात सर्व विद्यापीठांचे कुलगुरु, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने राज्य सरकारकडे आपला आहवाल सादर केला. विद्यार्थ्यांच शेवटच वर्ष अतिषय महत्त्वाच असतं त्यामुळे पदवीच्या अंतीम संत्रातील परीक्षा नेहमीप्रमाणे घेण्यात याव्या आणि प्रथम, द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरीच प्रश्न पत्रिका लिहण्यासाठी द्याव्या. विद्यार्थ्यांनी लिहलेल्या उत्तर पत्रिकेचे मुल्यमापन करुन प्राध्यपकांनी गुण द्यावे अशी शिफारस समितीने केली. मात्र, विद्यार्थ्यांना घरीच पश्न पत्रिका दिल्यामुळे कॉपी करण्याची शक्यता आहे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे गेल्या सत्रातील कामगीरी पाहून विद्यार्थ्यांना 50 टक्के गुण देण्याची शिफारस करण्यात आली. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने देशात २१ दिवसाचे लॉकडाऊन सुरु केले. २१ दिवसानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला आणि ३ मे पर्यत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठांना सुट्टी जाहीर केली. त्यामुळे ऐन परीक्षेच्या कालावधीत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे परीक्षा लांबणीवर गेल्या. परीक्षा कधी होणार? कशी होणार? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडले होते. यंदा परीक्षा होणार की नाही आशा दुविधा मनस्थितीत विद्यार्थी होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News