शिक्षकांचा 20 टक्के निधी सरकारने तात्काळ वितरीत करावा

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा- यिनबझ)
Friday, 1 May 2020
  • राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची उत्तर महराष्ट्र समन्वयिका दिव्या यशवंत या तरुणीने सरकारला केली मागणी

मुंबई: विना अनुदानित शाळेला टप्या टप्याने अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली. त्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात विना अनुदानित शिक्षकांना 20 टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले. मात्र, अद्याप कोणत्याही शिक्षकांना वेतन मिळाले नाही, त्यामुळे प्रलंबित असलेला 20 टक्के निधी सरकारने तात्काळ शिक्षकांना वितरीत करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची उत्तर महराष्ट्र समन्वयिका दिव्या यशवंत या तरुणीने सरकारकडे केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्राद्वारे मागमी केली आहे. 

माध्यमिक व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यावयांच्या शिक्षकांना 1 एप्रिल 2019 पासून 20 टक्के वेतन घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, अद्याप एकही रुपया शिक्षकांना मिळाला नाही. अनेक वर्षापासून शिक्षक विनावेतन विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहेत. शिक्षकांना तात्काळ वेतन मिळाळे नाही तर नैराशाच जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉडाऊन सुरु करण्यात आले. त्यामुळे मजूराप्रमाणे विनाअनुदानित शिक्षकांवर उपसामारीची वेळ आली. अशा वेळी शिक्षकांना वेतन मिळाळे नाहीत तर त्यांचे कुटुंब उध्वस्त झाल्या शिवाय राहणार नाही अशी खंड पत्रात व्यक्त करण्याात आली.        

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सरकारने मजूर, कामगार, शेतकरी यांना मोलाची मदत केली आहे. त्यांना अर्थसहाय्य देऊन जगण्याचे सामर्थ निर्माण केले आहे. अशीच मदत विना अनुअनुदानित शिक्षकांना करावी. शिक्षकांना 20 टक्के निधी वितरीत तरण्याचा आदेश प्रशासनाला द्यावा,  तसेच शासन निर्णय काढून शिक्षकांना टप्याटप्याने वेतन द्यावे अशी विनंती केली आहे. सरकारने ही विनंती मजूर केल्यास राज्यातील अनेक शिक्षकांना आर्थिक आधार मिळणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News