खास तरुणाईसाठी सरकारी नोकरी संधी; यंग प्रोफेशनल पदासाठी भरती, मिळणार ६० हजार वेतन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 21 September 2020

भारतीय अर्थव्यवस्थेला उभारणी देण्यासाठी डिजिटल इंडिया कार्यक्रम संपुर्ण देशात राबण्यात येत आहे. त्यासाठी कौशल्य प्राप्त तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली.

नवी दिल्ली : ईलेक्ट्रानिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या 'डिजिटल इंडिया कोर्पोरेशन'मध्ये यंग प्रोफेशनल पदासाठी जाहीरात प्रसिद्ध झाली. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला उभारणी देण्यासाठी डिजिटल इंडिया कार्यक्रम संपुर्ण देशात राबण्यात येत आहे. त्यासाठी कौशल्य प्राप्त तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. ही पदे केवळ कंत्राची तत्वावर भरण्यात येणार आहे. 

पदाचा तपशील, पात्रता आणि वेतन 

अनु.क्र     पदांचे नाव     पदे

१.     यंग प्रोफेशनल  २५

पदाचा कालावधी: 

  • 3 वर्षापैक्षा जास्त राहणार नाही

वेतन : 

  • उमेदवरांना दर महिना ६० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. 
  • या व्यतिरिक्त कोणतेही भत्ते आणि इतर सेवा सुविधा दिल्या जाणार नाहीत.

पात्रता:

  • बी.ई / बी. टेक विषयात पदव्युत्तर पदवी
  • दोन वर्षाचा पीजी डिप्लोमा इन मॉनेजमेन्ट/
  • कायद्याची (LLB) पदवी चार्टन अकाऊंटनन्ट (CA)/ इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (ICWA)
  • एम. फिल, पी. एचडी, संशोधनाचा अनुभव यांना प्राधान्य 

    

अर्ज कसा करावा: 

उमेदवरांना इमेल आणि गुगल फार्म दोन प्रकारे ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करुन गुगल फार्म भरता येईल. तसेच त्यांना गुगल फार्म भरणे शक्य नाही त्यांनी आपला CV/ Resune खालील इमेल आयडीवर सेंड करावा. जाहीरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत फार्म भरावा. त्यांनतर भरलेला फार्म ग्रह्य धरला जाणार नाही.

इ- मेल आयडी : negdadmin@digitalindia.gov.in

वय : उमेदवरांचे वय ३२ वर्षापेक्षा अधिक नसावे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News