तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता 

सकाळ यिनबझ
Saturday, 22 February 2020
  • या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदवीधर असणे गरजेचे आहे.

तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. दिल्लीतील उच्च न्यायालयामध्ये ही भरती करण्यात येणार आहे. ' "ज्युडिशिअल असिस्टंट" पदासाठी ही भरती असून एकूण १३२ जागा असणार आहे. त्यामुळे तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. 

१३२ पदांपैकी ३६ पदे ही जनरल वर्गातील आहेत, तर ईडब्ल्यूएससाठी २१, ओबीसीसाठी ३३ तर एससीकरीत २६ आणि एसटी वर्गातील उमेदवारांस १६पदे देण्यात आली आहेत. यासाठी १९ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली असून अंतिम तारीख ११ मार्च २०२० देण्यात आली आहे. जनरल, ओबीसी, एनसीएल, ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांसाठी ६०० रुपये शुल्क आकारण्यात आले असून इतर वर्गांसाठी ३०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदवीधर असणे गरजेचे आहे. त्यासोबतच टायपिंग येणं आवश्यक आहे. प्रति मिनिट ३५ शब्द स्पीड गरजेचा आहे. तर वयोमर्यादा ही १८ ते २७ दरम्यान असावी. 

यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची माहिती वाचून अर्ज भरावे. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईट  http://delhihighcourt.nic.in/  वर भेट देऊन अर्ज दाखल करू शकता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News