सरकारी नोकरीची संधी; पाहा काय आहे पात्रता  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी रोजगाराची नवी संधी उपलब्ध  झाली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मोठी भरती निघाली आहे. तब्ब्ल ५०० जागांसाठी ही भरती निघाली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. 

इंडियन ऑईलकडून वेस्टर्न रिजनसाठी ऑप्रेंटिस पदासाठी टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. साधारणतः १८ ते २४ या वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. 

या दोन्ही पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी वेगळी पात्रता आहे. १२ वी, डिप्लोमा, पदवी यामध्ये ५० गुण मिळणे आवश्यक आहे. तसेच ५० गुणांसह आयआयटी प्रमाणपत्र देखील यासाठी गरजेचे आहे. या दोन्ही पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २० मार्च आहे. 

या पदासाठी इच्छुक तसेच पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज  सादर केल्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांनी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावण्यात येईल. तसेच दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यांनतर उमेदवारांची मेडिकल चाचणी देखील घेण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेनंतर उमेदवारांना रुजू करण्यात येईल. 

दरम्यान याबाबत सविस्तर जाहिरात इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईट iocl.com वर देण्यात आली आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News