इंजिनीअर्ससाठी सरकारी नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू, सविस्तर वाचा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 August 2020

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) ने प्रकल्प अभियंता पदासाठी 60 जागा रिक्त केल्या आहेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) ने प्रकल्प अभियंता पदासाठी 60 जागा रिक्त केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बीई, बीटेक किंवा बीएससी अभियांत्रिकी केलेली असावी. या पदांच्या अर्जाची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पद   - प्रकल्प अभियंता (वैद्यकीय साधने)

पदांची संख्या - 60

वेतन- दरमहा 35,000 रुपये

वय मर्यादा - उमेदवारांचे कमाल वय 28 वर्षे असावे. वयोमर्यादा 1 ऑगस्ट 2020 पासून मोजली जाईल.

शैक्षणिक पात्रता- बीई, बीटेक, बी.एससी अभियांत्रिकी (४ वर्षे) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / टेलिकम्युनिकेशन / मेकेनिकल / इलेक्ट्रिक / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स / मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन

महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख - 12 ऑगस्ट 2020

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 26 ऑगस्ट 2020

अर्ज फी - सर्वसाधारण / ओबीसी / ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून 500 रुपये जमा करावे लागतील. एससी / एसटी / पीडब्ल्यूडी प्रवर्गासाठी अर्ज विनामूल्य आहे. फी एसबीआय कलेक्ट पासून भरावी लागेल.

अर्ज आणि निवड प्रक्रिया - दिलेल्या सूचनांनुसार उमेदवार बीईएल वेबसाइट bel-india.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. बीई / बीटेकमध्ये प्राप्त डेटा, कामाचा अनुभव आणि व्हिडिओ-आधारित मुलाखतीद्वारे या पदांच्या उमेदवारांची निवड केली जाईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News