औरंगाबाद मध्ये सरकारी नोकरी संधी; येथे करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोविड- १९ नियंत्रनासाठी कोविड केअर सेंटर, हेल्थ सेंटर मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आहोरात्र प्रयत्न करत आहे. मात्र अपुरे संसाधने आणि मणूष्यबळ असल्यामुळे आरोग्य विभागाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहे. रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा देण्यासाठी रिक्त जागा भरणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोविड- १९ नियंत्रनासाठी कोविड केअर सेंटर, हेल्थ सेंटर मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. या जागा केवळ ३ महिन्यासाठी तात्पुर्त्या स्वरुप आहेत. थेट मुलाखतीद्वारे आधारे या जाग भरण्यात येणार आहेत. शासकीय सुट्टी वगळून दररोज दुपारी १२ ते २ पर्यंत मुलाखती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शारीरिक अंतराचे नियम पाळणे सोपे जाणार आहे. 

पदाचे नाव आणि तपशील :  

अनु. क्र       पदांचे नाव              
१.         वैद्यकीय अधिकारी                         
२.      आयुश वैद्यकीय अधिकारी    
३.             स्टाफ नर्स 

शैक्षणिक पात्रता :
 
अनु. क्र. १ :  
एमबीबीएस
वेतन- ६० हजार

अनु. क्र.२ :  
बीएएमएस/ बयुएमएस, बीएचएमएस
वेतन- ४० हजार

अनु. क्र.३ :  
बी. एस्सी नर्गिंस/ जीएनएम
वेतन- २० हजार

मुलाखतीची वेळ : 

दररोज दुपारी १२ ते २ पर्यंत मुलाखत घेतली जाईल
शासकीय सुट्टीचे दिवस वगळून 

मुलाखतीची अंतिम तारीख : 

३१ जुलै २०२०   

मुलाखतीचे स्थळ : 

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, औरंगाबाद

अर्ज कसा करावा :

उमेदवारांनी ए४ पानावर सर्व माहिती लिहून किंवा टाईप करुन प्रत्यक्ष सादर करावी. अर्जासोबत वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, नोंदणी प्रमाणपत्र, कामाचा अनुभव, पासपोर्ट साईज फोटो चिटकावून मुलाखत वेळी सोबत आणावा. एका उमेदवाराला विविध पदासाठी अर्ज करायचा असेल तर पदानूसार स्वतंत्र अर्ज करावा.  

संपुर्ण जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
https://drive.google.com/file/d/1xaSUtu6iQR5ciOMeFZjb0t0rn2dEoJ4y/view

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News