मराठा तरूणांच्या मागण्यांकडे सरकारच दुर्लक्ष 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

मुंबई - मागील महिनाभरापासून विविध मागण्यांसाठी मराठा तरूणांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे, मात्र या विविध मागण्यांकडे सरकार कानाडोळा करत असल्याने, आंदोलन करणा-या मराठा तरूणांना न्याय देण्यासाठी सरकारला भाग पाडू अशी ग्वाही नुकतीच देवेंद्र फडणवीस नीतेश राणे आणि प्रवीण दरेकर यांनी आंदोलन करणा-या तरूणांना दिली. 

महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाला ब-याच नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. आज देवेंद्र फडणवीस, नितेश राणे आणि प्रवीण दरेकरांनी भेट दिली. त्यावेळी तेथील तरूणांच्या मागण्या समजून घेतल्या. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी मराठा तरूण आंदोलन का करत आहेत, ते समजून सांगितलं. विशेष महिनाभरापासून आंदोलन सुरू असलेल्या आंदोलनाचा सरकार का विचार करत नाही असा प्रश्नही नेत्यांनी उपस्थित केला. मराठा समाजाला आरक्षण हा मुद्दा अजून न्याय प्रविष्ठ आहे. त्यामुळे कायद्यातील तरतूदीनुसार तरूणांच्या नियुक्त्या व्हायल्या हव्यात, या संबंधी लवकरच विधीमंडळात याबाबत विचारणा करू असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News