सरकारने देशाचे आधीच नुकसान केले, आता तरी विद्यार्थ्यांचे ऐका: राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020
  • देशाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या भविष्यावर अवलंबून, सरकारने विचार करायला हवा : सोनिया गांधी

मुंबई : विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबद सध्या राजकारण तापलं आहे. भाजप सरकार परीक्षा घेण्यासाठी आग्रही आहे तर काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी एकत्र येऊन परीक्षेला विरोध केला आहे, त्यावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर करून भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. आणि आपली भूमिका मांडली. राहुल गांधीने केंद्र सरकारवर कडाकून टिका केली. परीक्षा मागे घेतली नाही तर तीव्र आंदोनल करण्याचा इशारा प्रधानमंत्री नरेद्र मोंदी यांना दिला. यावर सरकारकडून सध्या कोणतेही उत्तर आलेले नाही.

सरकारने देशाचे आधीच नुकसान केले, आता तरी विद्यार्थ्यांचे ऐका: राहुल गांधी

सरकारने देशाचे आधीच नुकसान केले, आता तरी विद्यार्थ्यांचं ऐका, जेईई आणि नीट परीक्षासंदर्भात विद्यार्थ्यांशी चर्चा करुन निर्णय घ्या असा सल्ला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिला. 'स्पीक अप फॉर स्टुडंट सेफ्टी' विद्यार्थ्यांच्या मोहिमेअंतर्गत राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर केला. त्यात ते म्हणाले 'मित्रहो विद्यार्थी हा देशाचा कणा आहे, देश घडवण्याचं काम विद्यार्थ्यांच्या हातात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून सरकारने निर्णय घ्यायला हवा. कोरोनाची परिस्थिती सरकारने योग्य प्रकारे हाताळली नाही त्यामुळे देशावर आर्थिक संकट कोसळले. या संकटाचा सामना करण्यास सरकार असमर्थ आहेत. सरकारने कोरोना काळात परीक्षा घेण्याचे नियोजन केले. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे असे मत राहुल गांधी यांनी व्हिडिओद्वारे व्यक्त केले

देशाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या भविष्यावर अवलंबून, सरकारने विचार करायला हवा : सोनिया गांधी

विद्यार्थ्यांशी चर्चा करून सरकारने परीक्षेचा निर्णय घ्यायला हवा, मात्र सरकारने परस्पर निर्णय घेतला, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे असे मत सोनिया गांधींनी एक व्हिडीओ शेअर करुन व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटले, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत, देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, या परिस्थितीला सामोरे कसे जावे याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे. आजचे तरूण उद्याचे भविष्य आहेत. देशाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या भविष्यावर अवलंबून आहे हा विचार सरकारने करायला हवा. सरकार मी विनंती करते विद्यार्थ्यांचे ऐकावे, विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार काम करावे, जय हिंद' असे सोनिया गांधींनी म्हटले आहे.

राज्य सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर न्यायालयाने दिलेल्या सूचनेप्रमाणे निर्णय घेतला जाईल: डॉक्टर भूषण पटवर्धन

यूजीसीचे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण पटवर्धन यांनी राज्य सरकारला लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पटवर्धन म्हणाले की, देशात आता परीक्षा होणार आहेत, काही विद्यापीठांनी यापूर्वीच परीक्षा घेतल्या आहेत तर ज्या विद्यापीठांनी परीक्षेचे आयोजन केले नाही त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आले, यासंदर्भात राज्य सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर न्यायालयाने दिलेल्या सूचनेप्रमाणे निर्णय घेतला जाईल असे पटवर्धन यांनी सांगितले.

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा अन्यथा आंदोनल करणार:  विद्याभारती संघटना

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याचा अध्यादेश काढावा अशी मागणी विद्याभारती संघटनेने केली. विद्याभारती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष मंजिरी धुळे आणि कार्यकर्त्यांनी कल्याणचे तहसीलदार यांना प्रधानमंत्र्यांच्या नावे पत्र निवेदन दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी केली, ही मान्य न झाल्यास विद्याभारती संघटना आंदोलन छेडेले जाईल असा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News