सरकारने निश्चित केली मास्क, हॅंड सॉनिटायझरची किंमत; विक्रेत्यावर कार्यवाही होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 21 March 2020

सरकारने मास्क आणि हॅंड सॉनिटायझरची सरासरी किंमत निश्चित केली आहे, अतिरीक्त रक्कम आकारणाऱ्या दुकानदारांवर कठोर कार्यवाही केली जाईल असा इशार दिला आहे

मुंबई: कोरोना विषाणूनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क आणि सॉनिटायझर वापरण्याचे आवाहन सरकारने केले. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी मास्क आणि सॉनिटायझर वारण्यास सुरुवात केली. त्यांमुळे बाजारात मास्क आणि सॉनिटायझ तुटवडा निर्माण झाला. दुकाण दारांनी आवाच्या सव्वा भावाने मास्क आणि सॉनिटायझ विकन्यास सुरुवात केली. याचा आर्थिक फटका नागरिकांना बसला. सरकारने मास्क आणि हॅंड सॉनिटायझरची सरासरी किंमत निश्चित केली आहे, अतिरीक्त रक्कम आकारणाऱ्या दुकानदारांवर कठोर कार्यवाही केली जाईल असा इशार दिला आहे. 

मास्कची सरासरी किंमत 10 पर्यंत तर हॅंड सॉनिटायझरची किंमत 100 रुपयाच्या आत राहणार आहे. या पेक्षा अधिक किंमत आकारणाऱ्या दुकानदारांवर कडक कार्यवाही करुन त्यांचे लाईसन्स रद्द करण्यात येईल अशी माहिती सरकाने दिली आहे. अधिक रक्कम घेणाऱ्या दुकान दाराविरोघात नागरिकांनी शासनाकडे तक्रार करावी अशी विनंती सरकारकडून करण्यात आली. 

5 ते 10 रुपयाचे मास्कचे 20-30 रुपयांना विकले जात आहे. तसेच 50-100 रुपये हॅंड सॉनिटायझची किमंत असताना 100- 200 रुपयाचा विकले जात होते, ही बाब शासनाच्या लक्षात आल्यामुळे सरकारने मास्क आणि हॅंड सॉनिटायझरची किंमत निश्चित केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News