तुमच्या व्हॉट्सअप मेसेजवर सरकारचे लक्ष? जाणून घ्या काय आहे सत्य 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 April 2020

हा मेसेज वाऱ्यासारखा व्हॉट्सअपवर फिरत आहे. मात्र यामध्ये किती तथ्य आहे, हे समोर आले आहे. 

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दर दिवशी सोशल मीडियावरून नव्या अफवा येत असतात. कोरोनामुळे या अफवांना जास्तच पेव फुटले आहे. सध्या देशभरात लॉकडाऊन असल्याने अनेकांचा वेळ हा सोशल मीडियावर जात आहे. विविध माध्यमातून प्रत्येकजण सोशल मीडियावर नवीन ट्रेंड घेऊन येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून एक मेसेज सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे. तो म्हणजे, या लॉकडाऊनच्या काळात सरकार तुमच्या व्हाट्सअप मेसेजवर नजर ठेवून आहे. 

काय आहे व्हायरल मेसेज?

व्हायरल मेसेजनुसार, जर तुम्ही व्हॉट्सअपवर कोणाला मेसेज पाठवत असाल, तर एक टिक दिसते. ज्यावेळी हा मेसेज समोरच्या व्यक्तीकडे पोहोचतो, त्यावेळी दोन  टिक दिसतात. जर रिसिर्व्हर हा मेसेज वाचतील तर ब्ल्यू टिक दिसते. मात्र त्याठिकाणी तुम्हाला तीन टिक दिसतील तर सरकार तुमचा मेसेज वाचत आहे. एक ब्ल्यू आणि दोन रेड टिकचा अर्थ आहे की, सरकार तुमच्या मसेजची पडताळणी करत आहे. ३ रेड टिक चा अर्थ सरकारने तुमच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच तुमच्यावर कारवाई करण्यात येईल.  

हा मेसेज वाऱ्यासारखा व्हॉट्सअपवर फिरत आहे. मात्र यामध्ये किती तथ्य आहे, हे समोर आले आहे. 

काय आहे सत्य?

भारत सरकारच्या वतीने प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने या  व्हायरल मेसहजची पडताळणी केली आहे. हा व्हायरल मेसेज बनावट असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले. तसेच सरकारने असे काहीही केले नसल्याचे सांगितले. त्यामुळं या अफवांवर विश्वस न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

दरम्यान सरकारने व्हॉट्सअपवर कोणतीही नजर ठेवली नसली, तरी याप्रकारचे व्हायरल मेसेज पडताळणी केल्याशिवाय फॉरवर्ड न करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी विशेष नियमावली देखील देण्यात आली आहे. व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिनला जास्त खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चुकीच्या माहितीचा प्रसार केल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत ग्रुप मेम्बर्सला देखील काळजी घेण्याचे सांगण्यात आलं आहे. कोणी चुकीची माहिती व्हायरल करत असेल तर त्याविरोधात जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आदेश देखील नागरिकांना देण्यात आले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News